IND vs Japan: टीम इंडियानं वाद घातला, पण जापानी खेळाडूंनी तरीही दाखवली माणूसकी, एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली
IND vs JAPAN: भारत आणि जापान यांच्यात टी-२० सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला, आता यानंतर जापानी खेळाडूने एक कृती केली ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

भारत जापान यांच्यात काल एकमेव टी-२० सामना रंगला. जो सामना भारतीय संघाने कसा बसा जिंकला. जापानी खेळाडूंनी भारतीय ंसंघाच्या नाकी नऊ आणलेले पाहायला मिळाले.
पावसामुळे हा सामना 5-5 ओव्हरचा झाला. त्यानंतर टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 32/4 एवढा स्कोअर केला. अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला, तर संजूने 10 रन, इशानने 3 आणि श्रेयस अय्यरने 16 धावा केल्या.
आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या जपानने भारताला शेवटच्या ओव्हरपर्यंत नाकी नऊ आणले. रवी बिश्नोईच्या ओव्हरमध्ये 10 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्यानंतर जपानला शेवटच्या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता होती.
अक्षर पटेलने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त दोन धावा दिल्या, त्यामुळे जपानचा स्कोअर 30/3 एवढाच झाला. भारताने सामना फक्त दोन धावांनी जिंकला. जपानच्या खेळाडूने शेवटच्या ओव्हरमध्ये रिव्हर्स स्वीप मारला, यानंतर अंपायरने वाईड दिला, पण कर्णधार श्रेयसने अंपायरसोबत वाद घातला आणि निर्णय बदलायला भाग पाडला.
वाईडच्या वादामुळे टीम इंडियाचा विजय झाला असला तरी जपानच्या खेळाडूंच्या एका कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे. जपानी खेळाडूंनी आपल्या जर्सी टीम इंडियाला दिल्या. यानंतर टीम इंडियानेही त्यांच्या जर्सी जपानच्या खेळाडूंना दिल्या. जपानच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसोबत फोटो काढले आणि जर्सीवर ऑटोग्राफही घेतली.