
कर्नाटक हायकोर्टाने नुकत्याच एका निकालात ट्रेनमधून पडून मरणाऱ्या महिलेला 8 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ही महिला कर्नाटकमधील चन्नापटणा रेल्वे स्टेशनवर चुकीच्या रेल्वेत चढली होती. पण घाबरुन तिने चालत्या रेल्वेतून उडी घेतली. त्यात तिचा मृत्यू ओढावला.

रेल्वेच्या दावा न्यायाधिकरणाने (Railway Claim Tribunal) मोबदला देण्यास विरोध केला होता. या दुर्घटनेत रेल्वेची चूक नाही. ही दुर्घटना पण नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास विरोध होता. रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 124 आणि 124 A अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होते.

Railwaरेल्वेतील दुर्घटनेवेळी मृत्यू ओढावल्यास भरपाई म्हणून 5 लाख रुपये, गंभीर जखमीला 2.5 लाख रुपये तर किरकोळ जखमीला 50 हजारांची मदत देण्यात येते.y

अनुचित प्रकारामुले मृत्यू ओढावल्यास 1.5 लाख रुपये, गंभीर दुखापत झाल्यास 50 हजार तर किरकोळ जखमीला पाच हजार रुपये भरपाई देण्यात येते.

दुर्घटनेवेळी विम्याची रक्कम पण देण्यात येते. ऑनलाईन तिकीट बुकिंगवेळी प्रवाशी हा पर्याय निवडू शकतो. अपघातात मृत्यू झाल्यास वारसाला 10 लाख रुपये मिळतात.

तर पूर्णतः अपंगत्व आलेल्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचा विमा मिळतो. दुर्घटनेमुळे आंशिक अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला 7.5 लाख रुपये विम्या पोटी देण्यात येतात. तर जखमी आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास दोन लाख रुपये देण्यात येतात.