
रेल्वेने प्रवास करायचं ठरलं की सर्वात आधी तिकीट काढलं जात. आजकाल ऑनलाइन तिकीटाची सोय झाली असली तर बहुतांश लोकं आजही रेल्वे स्टेशनवर जाऊन, तेथील तिकीट विंडोवरूनच तिकीट विकत घेतात. रेल्वे स्टेशनच्या खिडकीवर तिकीट काढून देणाऱ्या कर्मचाऱ्याला रेल्वे तिकीट क्लर्क (Railway Ticket Clerk) म्हणतात. Photos Credit: Getty Images

हे Indian Railways अर्थात भारतीय रेल्वेचे कर्मचारी असतात. आणि त्यांचे पगार हे नियमांनुसार ठरलेले असतात. रेल्वे तिकीट क्लर्क, हे स्टेशनवरील तिकीट काउंटरवर बसून प्रवाशांना तिकिटे देतात, पैशांचा हिशोब ठेवतात आणि प्रवाशांना एखादी माहिती हवी असेल तर त्यासंबंधित मदत करतात. Photos Credit: Getty Images

ही सरकारी नोकरी आहे, त्यामुळे चांगला पगार आणि बरेच फायदे मिळतात. (7th Pay Commission नुसार) सुरुवातीचा पगार 21 हजार 700 रुपये प्रति महिना आहे . एकूण पगार (भत्त्यांसह) अंदाजे 30 ते 40 हजार रुपये प्रति महिना असतो. Photos Credit: Getty Images

5–10 वर्षांच्या अनुभवानंतर, तुम्ही दरमहा 40,000 ते ₹60,000पर्यंत कमवू शकता. बढतीनंतर, तुमचा पगार 60 हजारांच्या पेक्षा जास्तही होऊ शकतो. Photos Credit: Getty Images

पगाराव्यतिरिक्त, रेल्वे तिकीट क्लर्कला महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, पेन्शन आणि नोकरीची सुरक्षा मिळते. या नोकरीसाठी पात्र ठरायचं असेल तर संबंधित व्यक्ती किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Photos Credit: Getty Images

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.) Photos Credit: Getty Images