
टीम इंडियाचा सर्वात फिट असलेला खेळाडू विराट कोहलीकडे पाहिलं जातं. कारण विराटने तसा आपला फिटनेस ठेवला आहे. मात्र युवराज सिंहच्या वडिलांनी वेगळाच दावा केला आहे.

वयाच्या 38 व्या वर्षी मोहिंदर अमरनाथ यांनी वर्ल्ड कप जिंकला. फायनल सामन्यातही तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. भारतीय क्रिकेटमधून वयाचा घटक काढून टाकला पाहिजे, असंही योगराज सिंह म्हणाले.

वय हा एक फक्त आकडा आहे. ज्या खेळाडूचे वय 40 किंवा 42 व्या वर्षी तंदरुस्त असेल आणि चांगली कामगिरी करत असाल तर चुकीचं काय आहे. तुमचं वय झालं तरी तुम्ही संपू शकत नसल्याचं योगराज सिंह यांनी म्हटलं आहे.

रोहित शर्मा आपल्या वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत खेळू शकतो. त्यासोबतच वीरेंद्र सेहवागही असा खेळाडू होता जो वयाच्या ५० वर्षापर्यंत खेळू शकला असल्याचं योगराज सिंह यांनी म्हटलं आहे.

योगराज सिंह यांनी केलेल्या दाव्याची जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. रोहितनंतर भारताचा कॅप्टन कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.