सौंदर्य पाहूनच प्रेमात पडाल, भारतातील ही 4 ठिकाणं उन्हाळ्यातही देतात थंडीचा आनंद

उन्हाळ्याच्या कडक तापमानापासून थोडा आराम मिळवायचा असेल तर इंदौरजवळील ही ठिकाणे तुमच्यासाठी ठरू शकतात एकदम परफेक्ट. येथे निसर्गरम्य वातावरण, धबधबे आणि शांतता यामुळे तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल.

| Updated on: Apr 14, 2026 | 1:12 PM
1 / 6
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल तर आता बॅग पॅक करा आणि निघा मध्य प्रदेशातील इंदौरच्या थंडगार सहलीला. इंदौर शहर आणि त्याच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला कडक उन्हातही थंडावा अनुभवायला मिळतो.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल तर आता बॅग पॅक करा आणि निघा मध्य प्रदेशातील इंदौरच्या थंडगार सहलीला. इंदौर शहर आणि त्याच्या आसपास अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला कडक उन्हातही थंडावा अनुभवायला मिळतो.

2 / 6

विशेष म्हणजे, या ठिकाणांपैकी काही ठिकाणे अशी आहेत, ज्याबद्दल अनेकांना माहितीही नसते. चला तर मग, इंदौरजवळील अशा 7 सुंदर आणि थंडगार पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

3 / 6

इंदौरपासून सुमारे 35 किमी अंतरावर महू तहसीलमध्ये असलेला पाताळपानी धबधबा उन्हाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. सुमारे 300 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा दूरवरूनही अत्यंत आकर्षक दिसतो. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत पिकनिकसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

4 / 6

इंदौरपासून 25-30 किमी अंतरावर सिमरोल गावाजवळ टिंचा फॉल्स आहे. ट्रेकिंग, नेचर फोटोग्राफी आणि पिकनिकसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. खंडवा रोडने सहज पोहोचता येते. येथे येताना खाण्यापिण्याची सोय स्वतःसोबत आणणे योग्य ठरते.

5 / 6

टिंचा फॉल्सच्या जवळच, खंडवा रोडवर असलेला मोहादी वॉटरफॉल इंदौरपासून सुमारे 30-35 किमी अंतरावर आहे. शांत वातावरण, हिरवळ आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. येथे पोहोचण्यासाठी काही अंतर पायी चालावे लागते कारण रस्ता कच्चा आहे.

6 / 6

इंदौरपासून सुमारे 55-60 किमी अंतरावर मनपूरजवळील रामपुरिया बुजुर्ग गावाजवळ हा धबधबा आहे. येथे तीन प्राचीन गुहा आणि शीतला मातांचे मंदिर आहे. ट्रेकिंग, पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी हे ठिकाण अतिशय योग्य आहे. NH46 मार्गाने येथे दोन तासांत पोहोचता येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us