इंदोरीकर महाराजांनी लेकीच्या लग्नातच सांगून टाकलं, गुपचूप करतायत असं काम की…राज्यभर होतंय कौतुक, समजताच ठोकाल सलाम!

असे असताना ते फक्त कीर्तनाच्याच माध्यमातून लोकप्रबोधन करतात, असा समज होता. परंतु ते एक विद्यालय चालवून मुलांना शिक्षित करण्याचेही काम करत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

| Updated on: May 03, 2026 | 9:33 PM
1 / 5
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा आज विवाह संपन्न झाला. या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्याचे भव्य आयोजन केले होते.

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा आज विवाह संपन्न झाला. या शाही विवाह सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्याचे भव्य आयोजन केले होते.

2 / 5

इंदोरीकर महाराजानी आपल्या मुलीचा जेव्हा साखरपुडा केला होता, तेव्हा त्यांची अशीच चर्चा झाली होती. साखरपुड्यात झालेला खर्चही तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. आता हा लग्नसोहळाही तेवढाच चर्चेत आला आहे.

3 / 5

इंदोरीकर महाराज यांनी आपल्या मुलीच्या लग्नसोहळ्यात उपस्थितांचे आभार मानले. तसेच पाहुण्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मी माझ्या मुलीच्या लग्नात मठ्ठा आणि गुलबजाम हे खाद्य पदार्थ न ठेवता मराठमोळं आणि सात्विक जेवन ठेवलेलं आहे, असं आवर्जून सांगितलं.

4 / 5

तसेच, आज मुलगा, मुलगी मोठी झाले ते दिसतंय. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती. माझ्या मुलाचीदेखील तीन वर्ष झाले भेट नाही, असे म्हणत मन मोकळे केले. तसेच मी विद्यालय चालवतोय. त्यासाठी एक रुपयाही घेत नाही. या शाळेत 13 शिक्षक आहेत, असे इंदुरीकर महाराज यांनी सांगितले.

5 / 5

इंदुरीकर महाराज एक विद्यालय चालवत आहेत, हे समजताच आता राज्यभरात त्यांचे कौतुक होत आहे. इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील कुप्रथा तसेच तरुणाईच्या चुकीच्या सवयींवर भाष्य करताना दिसतात. त्यांच्या कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us