Indurikar Maharaj : 100 एकरवर आलिशान मंडप… जेवणाची रेलचेल… इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह सोहळा, मंडप पाहून डोळे दिपले

समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा उद्या पार पडणार आहे. तब्बल १०० एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरुवात होईल. साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

| Updated on: May 02, 2026 | 1:49 PM
1 / 8
 प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर सदैव चर्चेत असतात. कीर्तनातून इतरांना साधेपणाचा सल्ला देणारे, लग्न साधे करा, खर्च कमी करा असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात झाल्याने ते काही महिन्यांपूर्वी वादात सापडले होते. त्यांच्यावर बरीच टीका झाली.

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर सदैव चर्चेत असतात. कीर्तनातून इतरांना साधेपणाचा सल्ला देणारे, लग्न साधे करा, खर्च कमी करा असं सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात झाल्याने ते काही महिन्यांपूर्वी वादात सापडले होते. त्यांच्यावर बरीच टीका झाली.

2 / 8

आता त्यांच्या मुलीचं लग्न असून ,लग्नपत्रिकाही समोर आली आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा, साहिल याच्याशी संगमनेरमध्ये होणार आहे.

3 / 8

या शाही विवाहसोहळ्यााठी गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर किर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे.

4 / 8

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, राजकीय दिग्गज आणि संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अनेक राजकीय दिग्गज आणि संत-महंतांची या विवाहासाठी उपस्थिती अपेक्षित आहे. एकीकडे कीर्तनातून लोकांना साधेपणाचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता विवाहामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

5 / 8

साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता स्वतःच चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कन्येच्या भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. “उपदेश एक आणि आचरण दुसरं” असा सवालही नेटकऱ्यांनी उपस्थित केला होता.

6 / 8

दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी स्वतःच साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता उद्या होणाऱ्या या विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण परिसरात मोठा सोहळा उभारण्यात आला आहे. 100 एकरवर आलिशान मंडप उभारण्यात आला असून जेवणाचीही बरीच रेलचेल असणार आहे.

7 / 8

विशेष म्हणजे याच दिवशी गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. त्यानंतर किर्तनपुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या मोठमोठ राजकारणी, दिग्गजांना संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या विवाहसोहळ्याकडे राज्यभराचं लक्ष लागलंय.

8 / 8

साधेपणाचा संदेश देणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us