Adnan Sami : राजेशाही थाट अन् संगीताचा अनमोल वारसा, अदनान सामीच्या घराची शाही झलक; दुर्मिळ वस्तू पाहून फराह झाली थक्क!
फराह खानच्या व्लॉगमध्ये अदनान सामीचे मुंबईतील पेंटहाऊस पाहून सगळेच थक्क झाले. त्याच्या घरात जगभरातील दुर्मिळ अँटिक वस्तू, कोट्यवधींचे संगीत रेकॉर्ड्स आणि अलिशान सजावट आहे.

कोरिओग्राफर -दिग्दर्शक फराह खानचा व्लॉग खूप फेमस आहे. नुकतीच ती गायक अदनान सामीच्या घरी पोहोचली. पाकिस्तान सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारलेला गायक अदनान सामी आता मुंबईतच सेटल झाला आहे. त्याचं घर इतर सेलिब्रिटीजपेक्षा खूपच वेगळं आहे. त्याच्या पेंटहाऊसमध्ये जगभारातून आणलेल्या विविध गोष्टी, दुर्मिळ अँटिक आयटम्स, ओरिजनल रेकॉर्डस आणि अत्यंत महागड्या वस्तू आहेत. त्यातील कित्येक गोष्टींची किंमत लाखोंमध्ये आहे. फराह खानच्या व्लॉगमध्ये त्याची खास झलक पहायला मिळाली. त्याचं बहुतांश घर हे ऑफ-व्हाइट टोनमध्ये सजवण्यात आलं असून तिथे न्युझिक स्टुडिओस होम थिएटर, पूजेचं जालन आणि ऑफिसही आहे.
पहिल्या नजरेतच त्याची ड्रॉइंग रूम एकदम रॉयल व्हाइब देते. क्रीम रंगाचे मखमली सोफे, जमिनीवर अंथरलेले महागडे इराणी कार्पेट आणि भिंतींवर लावलेले कुटुंबाचे फोटो. एका बाजूने सूर्यकिरणे थेट घरात येतात आणि संपूर्ण घर उजळून निघतं. साधेपणा आहे, पण त्यात एक वेगळीच शान आहे—अगदी नवाबी थाट !
मध्यभागी ठेवलेला काळ्या रंगाचा चमचमणारे ग्रँड पियानो लक्ष वेधून घेतो. भिंतींवर त्यांच्या सुपरहिट गाण्यांचे अस्सल आणि ओरिजिनल रेकॉर्ड्स फ्रेम करून लावलेले आहेत, जणू त्यांनी आपला संपूर्ण संगीतप्रवासच सजवून ठेवला आहे. एका कोपऱ्यात बीथोव्हेन आणि मोझार्ट यांचे पुतळे, तसेच एक व्हिंटेज घड्याळ आहे. यावरून अदनान यांचे संगीतावरील प्रेम किती खोल आहे, हे स्पष्टपणे जाणवते.
अदनानने सांगितलं की त्याने हे संग्रहातील सामान लिलावातून कोट्यवधी रुपये मोजून खरेदी केलंय. यामध्ये भारतातील पहिल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘आलम आरा’चे रेकॉर्ड, तसेच इंग्रजी संगीतविश्वातील एल्विस प्रेस्ली आणि बीटल्स यांचे रेकॉर्ड्सदेखील समाविष्ट आहेत.
अदनान सामीने त्याच्या घरात लाकडाच्या एका सुंदर कॅबिनेटमध्ये चांदीच्या अनेक अँटिक वस्तू सजवून ठेवल्या आहेत. यामध्ये चांदीचे जग, ग्लास, टी-सेट, मोर-मोरनीच्या कलाकृती आणि इतर अनेक जुन्या वस्तूंचा समावेश आहे. पहिल्या नजरेत या वस्तू एखाद्या राजेशाही हवेलीतील संग्रहाचा भाग असल्यासारख्या वाटतात.
त्याच्या घरात डॉल्बी साउंडची सुविधा असलेले एक शानदार खासगी सिनेमा हॉलदेखील आहे. या होम थिएटरची सजावटही अतिशय खास आहे. खोलीमध्ये जुन्या काळातील रेकॉर्ड प्लेअर्स आणि साउंड सिस्टमदेखील ठेवण्यात आले आहेत.
अदनान याच्याकडे असलेला संग्रह केवळ भारतीय सिनेमापुरता मर्यादित नाही. त्यांच्या भिंतींवर ‘द बीटल्स’ आणि ‘एल्विस प्रेस्ली’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय संगीतविश्वातील दिग्गजांशी संबंधित रेकॉर्ड्सदेखील पाहायला मिळतात.
त्याच्या कलेक्शनमध्ये अस्सल हस्तलिखितांचाही समावेश आहे, त्यापैकी काही अतिशय दुर्मिळ आहेत. हे सगळं पाहून एक क्षण तर फराहचाही तिच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.