BAPS च्या महंत स्वामी महाराजांची दिव्य प्रेरणा, 40,000 बालकांची संस्कृतपासून संस्काराकडे वाटचाल

मिशन राजीपोः बीएपीएसचे महंत स्वामी महाराज यांच्या दिव्य दृष्टीतून अनोखा संस्कार साकारला गेला आहे. यात सुमारे 40,000 बालकांनी संस्कृतपासून संस्काराकडे वाटचाल करीत शुद्धता, शिस्त आणि करुणेचे जीवन स्वीकारले आहे.आजच्या काळात, जिथे डिजिटल तंत्रज्ञान मनाला उत्तेजित करते, पण शांती हरवून टाकते, त्यावेळी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचा ‘मिशन राजीपो’ हे मिशन एक प्रकाशपथ बनून समोर आले असून त्यामुळे अध्यात्मिक शिक्षण आणि चारित्र्यनिर्मिती एकाच वेळी घडत आहे.

| Updated on: Oct 29, 2025 | 6:53 PM
1 / 7
परम पूज्य महंत स्वामी महाराजांनी सन 2024 मध्ये हा दिव्य संकल्प केला होता की, जगभरातील बालकांनी संस्कृत श्लोकांचे अध्ययन आणि पाठ करावेत. त्यांनी सांगितले की,'संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.जे बालक संस्कृत श्लोक आत्मसात करून जीवनात उतरवतात, ते फक्त आध्यात्मिक दृष्ट्याच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतात असाही उपदेश त्यांनी दिला होता.

2 / 7
 महंत स्वामी महाराजांनी सुरुवातीला एका वर्षात 10,000  बालकांनी संस्कृत श्लोक कंठस्थ करावेत असे लक्ष्य ठेवले होते., परंतु ही प्रेरणा जणू पवित्र अग्नीसारखी पसरली  आणि जे उद्दिष्ट होते ते आंदोलनात परिवर्तित झाले.  40,000 हून अधिक बालकांनी यात  उत्साहाने सहभाग घेतला आहे.  यांपैकी 15,666 बालक-बालिकांनी सत्संग दीक्षा ग्रंथातील सर्व 315 संस्कृत श्लोक पूर्णपणे कंठस्थ करून ही परीक्षा उत्तीर्ण केली. हजारो इतर बालक आजही या अध्ययन, चिंतन आणि आत्मपरिवर्तनाच्या साधना-प्रवासात पुढे जात आहेत.

3 / 7
महंत स्वामी महाराजांची दृष्टी आध्यात्मिक तर होतीच, पण वैज्ञानिकही होती. त्यांनी सांगितले की संस्कृत उच्चाराला शुद्धता, शब्दसंपत्तीला समृद्धी आणि बुद्धीला तीक्ष्णता देते. नियमित संस्कृत श्लोकजप एकाग्रता, स्पष्टता आणि मानसिक पवित्रता वाढवते. हे आज आधुनिक विज्ञानही मान्य करते. त्यामुळे त्यांनी संस्कृतला फक्त धार्मिक भाषा नव्हे, तर अंतःशिस्त आणि आत्मपरिवर्तनाचे “आध्यात्मिक विज्ञान” म्हटले आहे.

4 / 7
सत्संग दीक्षा – जीवनाचे दिशा-सूत्र : सत्संग दीक्षा मधील 315 श्लोक हे फक्त वाचण्यासाठी नाहीत, तर जगण्यासाठी आहेत. प्रत्येक श्लोक हा एक नैतिक दिशादर्शक आहे. जो बालकांमध्ये खालील गुणांचा विकास करतो. 1) सत्यनिष्ठा: सत्य बोलणे आणि प्रामाणिकपणे जगणे, 2) न्याय आणि अपरिग्रह: जे आपले नाही ते न घेणे आणि निष्पक्ष राहणे,3) एकाग्रता आणि अध्ययन: मनापासून आणि निष्ठेने शिकणे, 4) सेवा आणि करुणा: इतरांची मदत करणे आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणे,

5 / 7
5) ममता आणि श्रद्धा: प्रत्येक जीवामध्ये भगवानाचे दर्शन करणे, 6) आदर आणि आज्ञाधारकता: पालक, गुरुजन आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान करणे, 7) एकता आणि सहकार्य: सर्वांच्या उन्नतीत स्वतःची उन्नती पाहणे 8) अनुशासन आणि मर्यादा: संयम आणि सदाचारपूर्ण जीवन जगणे 9) धैर्य आणि आत्मसंयम: क्रोधावर विजय मिळवून अंतर्मनात शांती प्रस्थापित करणे.

6 / 7
 या श्लोकांद्वारे बालके शिकत आहेत की खरे ज्ञान तेच आहे जे आचरणात उतरते. ते फक्त संस्कृत शिकत नाहीत, तर करुणा, नम्रता, सत्य आणि सामंजस्याचे संस्कार आत्मसात करत आहेत.जे दिव्य जीवनाचे सार आहेत.भारत, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, यूएई, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आफ्रिकापर्यंत जगभरातील बालक-बालिकांनी या भक्ती आणि शिस्तीच्या यज्ञात सहभाग घेतला आहे. यांच्या मागे होते 103 साधूगण, 17,000 स्वयंसेवक आणि 25,000 पालक, ज्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे अभियान जागतिक संस्कार-चळवळ बनले.

7 / 7
 मिशन राजीपो – श्रद्धेचे भविष्य, पवित्रतेची शक्ती - हा उपक्रम सिद्ध करतो की जेव्हा संस्कार बालपणी पेरले जातात, तेव्हा भविष्य प्रकाशाने उजळते. आजची ही बालकेच उद्याची “परंपरा-प्रदीपक” बनत आहेत. जी आधुनिकतेसोबत अध्यात्म, बुद्धीसोबत प्रामाणिकता आणि अध्ययनासोबत प्रेम यांचा सुंदर मिलाफ घडवत आहे.