करोडोंचा कप, लाखोंची हँडबॅग; नीता अंबानींचा एका दिवसाचा खर्च किती? आकडा वाचून धक्काच बसेल!
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. पण सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांचा एकूण खर्च ऐकून तुम्हालाही धक्का बसेल...

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी ओळखले जातात. त्यांच्या पत्नी नीता अंबानी कायमच चर्चेत असतात. एखाद्या इव्हेंट किंवा फंक्शनमध्ये त्यांना नेहमी स्पॉट केले जाते. आतापर्यंत असा एकही प्रसंग झालेला नाही की नीता अंबानींनी एखादी साडी, सँडल किंवा हँडबॅग पुन्हा वापरली असेल. जी वस्तू एकदा घालतात किंवा वापरतात, ती दुसऱ्यांदा त्या कधीही घालताना दिसत नाहीत. हीच अंबानी कुटुंबीयांची शान आणि शौक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का नीता अंबानी यांचा एका दिवसाचा खर्च किती आहे?
नीता अंबानींचा २४ तासांचा खर्च लाखो रुपये
समोर आलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांचा खर्च खूप असतो. पण तुम्हाला माहिती आहे का नीता अंबानी एका दिवसात किती पैसे खर्च करतात? हे जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते. जितकी तुमची वर्षभराची कमाई होत नाही, त्याच्या चारपट जास्त पैसा नीता अंबानी एका दिवसात खर्च करतात असे म्हणणं वावगं ठरणार नाही. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत त्यांचा लाखो रुपये खर्च आहे. चला जाणून घेऊया नीता अंबानी किती आणि कुठे खर्च करतात?
तीन लाखांच्या कपात चहा पितात नीता अंबानी
एक यूट्यूब शॉर्ट्समध्ये सांगितलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी दिवसाची सुरुवात चहाने करतात आणि त्यांच्या एक कप चहाची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे. सांगितले जाते की त्या नॉरिटेक (Noritake) ब्रँडच्या कपात चहा पितात, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये असते. याशिवाय नीता अंबानी महागड्या ब्रँडचे कपडे घालतात.
नीता अंबानींकडे महागड्या ब्रँडच्या हँडबॅग
नीता अंबानी यांच्या हँडबॅगबद्दल बोलायचे झाले तर जगभरातील महागडे ब्रँड त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे Hermes, Sac Bijou Birkin, Himalaya Birkin सारख्या महागड्या हँडबॅग आहेत. सांगितले जाते की नीता अंबानी एक हँडबॅग पुन्हा रिपीट करत नाहीत. याशिवाय त्यांना महागड्या ज्वेलरीचा शौक आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये १०० कोटी, ५०० कोटी आणि १००० कोटींपर्यंतच्या ज्वेलरी आहेत. रोजच्या वापरात ज्या ज्वेलरी घालतात त्या लाखोंच्या असतात. या यूट्यूब चॅनेलनुसार, नीता अंबानी एका दिवसात ४० लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करतात.
