AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LNG पुरवठ्याची समस्या समाप्त होणार, उत्पादनात वेग आणण्याची कतारची तयारी, २ महिन्यात ८० टक्के उत्पादन वाढेल..

इराण आणि अमेरिकेत 19 जून रोजी स्विर्त्झलँड येथे ऐतिहासिक शांतता करार होणार आहे. त्यानंतर होमुर्झ खुली होणार आहे. त्यानंतर एलएनजीचे उत्पादन वाढवण्याची घोषणा कतार या देशाने केली आहे.

LNG पुरवठ्याची समस्या समाप्त होणार, उत्पादनात वेग आणण्याची कतारची तयारी, २ महिन्यात ८० टक्के उत्पादन वाढेल..
Qatar Energy
| Updated on: Jun 16, 2026 | 5:32 PM
Share

इराण आणि अमेरिकेत सामंजस्य करार होणार आहे. त्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Strait of Hormuz) खुली होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर कतारने लिक्वीफाईड नॅचरल गॅस ( LNG ) च्या पुरवठा वेगाने वाढवण्याची योजना आखली आहे. कतारचे टार्गेट दोन महिन्याच्या आता जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्षमता बहाल करण्याची योजना आहे. कतारची एलएनजी फॅसिलिटीला ऑपरेट करणारी कंपनी ‘कतार एनर्जी’ ने खरेदीदारांना सांगितले की आम्हाला आशा आहे की होर्मुझमधून सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्यानंतर एक महिन्यात उत्पादन क्षमता सुमारे ५० टक्के आणि दोन महिन्यात सुमारे ८० टक्के वाढणार आहे.

प्रोडक्शन बहाल होण्यास किती वेळ लागणार ?

या संदर्भातील माहिती ठेवणाऱ्यांनी सांगितले की उर्वरित कॅपेसिटी जी दोन प्रोडक्शन ट्रेन ( उत्पादन युनिट्स ) च्या बरोबर आहे. त्यास संपूर्णपणे बहाल होण्यासाठी अनेक वर्षे लागतील, कारण मार्चमध्ये इराणच्या क्षेपणास्रांनी याचे नुकसान केले होते.

प्रतिष्ठेला धक्का पोहचला –

कतारने युद्धाच्या पहिल्याच आठवड्यात इराणच्या हल्ल्यानंतर जगातील सर्वात मोठी एलएनजी ( LNG ) फॅसिलिटीला बंद केले होते. त्यामुळे ऑर्डर रद्द झाले आणि विश्वासार्ह पुरवठादार म्हणून कंपनीने प्रदीर्घकाळ बनवलेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

पुन्हा सुरु करण्याची तयारी –

रास लाफान कॉम्प्लेक्सने गेल्या वर्षी जागतिक पुरवठ्याचा सुमारे पाचवा भाग निर्यात केला होता, ती साईट तीन महिन्यांहून अधिक काळ जवळपास बंद पडली आहे.कारण होर्मुझ सामुद्रधुनी बंद पडल्याने मोठ्या प्रमाणात गॅसचा शिपमेंट करणे खूपच कठीण झाले होते. परंतू कतार एप्रिलपासून वेगाने यास पुन्हा सुरु करण्याच तयारी करीत आहे.

कमी क्षमतेने चालू प्रोडक्शन यूनिट

ब्लूमबर्गच्या एप्रिलच्या बातमीनुसार कतार एनर्जी (QatarEnergy)उपकरणांची चाचणी आणि आवश्यक मेन्टेनन्सचे काम करत आहे. माहितीगाराच्या म्हणण्यानुसार अनेक प्रोडक्शन युनिट कमी क्षमतेने चालत आहेत. म्हणजे प्लांट शेजारील देशांना शिपमेंट पाठवू शकतील आणि गरज पडल्यास प्रोडक्शन वाढवू शकतील. एक महिन्याच्या आत आपल्या प्रोडक्शनचा अर्धा भाग पुन्हा सुरु करणे हे काही एनालिस्ट आणि ट्रेडर्सच्या मते अपेक्षा जास्त आहे.

करारावर सह्या

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटले आहे की होर्मुझ शुक्रवार पर्यंत खुलेल.मात्र, जोपर्यंत स्विर्त्झलँडमध्ये इराणच्या सोबत एका अंतरिम करारावर हस्ताक्षर होणे बाकी आहे. मात्र, त्यांचे युरोपिय सहकारी त्यांच्या या आशेशी सहमत नाहीत. एका अन्य वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले की अजूनही तेथील पाण्याखाली सुरुंग (माइन्स) हटवण्याची गरज आहे.जहाजांचे मालक, व्यापारी आणि उत्पादक या स्थितीची स्पष्ट माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कमी होणार गॅस पुरवठा समस्या

कतारने LNG चा पुरवठा सुरु होण्याने जगभरातील टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. अमेरिका आणि इराणच्या दरम्यान शांतता कराराची बोलणी सुरु झाल्यानंतर युरोप आणि आशियात एलएनजीच्या किंमती युद्धाच्या आधीच्या तुलनेत जास्त वाढल्या आहेत. कतारच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या टँकरचे लोकेशन लपवून फारसच्या खाडीतून आशियातील खरेदीदारांना काही शिपमेंट पोहचवण्यात यशस्वी झाला आहे. परंतू ही डिलिव्हरी अजूनही सामान्याहून खूप कमी आहे.

Follow Us
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक