AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

तुमचे रक्त गोड असल्याने तुम्हाला जास्त डास चावतात, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे डास चावू नयेत म्हणून घराची स्वच्छता ठेवायला हवी. कुठेही पाणी साचू नये याचाही काळजी घ्यावी.

डास तुम्हालाच सर्वाधिक का चावतात? शेवटी उत्तर मिळालं; खरं कारण वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
mosquito biteImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 5:33 PM
Share

Why Mosquitoes Bites : डास म्हणजेच मच्छर या पृथ्वीतलावर शेकडो वर्षांपासून आहे. डास अंगाला चावल्यास अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच अंगाला डास चावू नयेत म्हणून योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना वारंवार केल्या जातात. परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की डास एखाद्या व्यक्तीला खूपच चावत असतात. चार ते पाच लोक एकत्र बसलेले असतानाही डास एखाद्या विशेष व्यक्तीलाच सतत चावत असतात. यामागचे नेमके कारण काय आहे? असे अनेकदा विचारले जाते. आता याच प्रश्नाचे उत्तर शेवटी मिळाले आहे. एखाद्या व्यक्तीला डास चावण्याचे प्रमाण जास्त का असते, हे जाणून घेऊ या…

मिळणाऱ्या संकेतांकडे डासांचे खूप लक्ष

डासांना काही खास लोकांचे रक्त खूप आवडते, असे आपण नेहमी म्हणतो. परंतु या दाव्यामध्ये खरंच सत्यता आहे का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. तुमचा श्वासन, शरीराचा गंध, कपड्यांचा रंग यासह शरीराचे तापमान या सर्व गोष्टीच तुम्हाला डास जास्त चावणार की कमी हे ठरवत असतात. तुमच्या शरीरातून मिळणाऱ्या संकेतांकडे डासांचे खूप लक्ष असते. तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा डासांना तुमचा पत्ता समजतो. म्हणजेच तुम्ही श्वास घेतला की त्यातून येणाऱ्या खास गंधामुळे डास तुमच्याकडे आकर्षित होतात.

गडद रंगाचे कपडे घातल्यास ….

तुमच्या घामाचा गंधदेखील डासांना तुमच्याकडे आकर्षित करत अशतो. तुम्हाला घाम जास्त येत असेल तर तुम्हाला डास चावण्याची शक्यतादेखील जास्त असते. ज्या लोकांचे तापमान जास्त असते, त्या लोकांना डास चावण्याचे प्रमाण जास्त असते. डासांना गडद रंगाचे कपडे जास्त आकर्षित करतात. तुम्ही काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे परिधान केले तर तुम्हाला डास चावण्याची शक्यता जास्त असते.

दरम्यान, तुमचे रक्त गोड असल्याने तुम्हाला जास्त डास चावतात, असा दावा केला जातो. परंतु या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे डास चावू नयेत म्हणून घराची स्वच्छता ठेवायला हवी. कुठेही पाणी साचू नये याचाही काळजी घ्यावी.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा