
भारतात एक काळ होता, जेव्हा महिलांचे जीवन फक्त घरगुती आणि घरपुरते मर्यादित होते, परंतु आज महिलांचा सहभाग प्रत्येक क्षेत्रात आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना समान स्पर्धा देत आहेत आणि त्यांची क्षमता सिद्ध करत आहेत. जगभरातील महिलांच्या या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या 12व्या आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. 2007मध्ये त्यांनी हे पद स्वीकारले आणि 2012पर्यंत त्या या पदावर राहिल्या. प्रतिभा पाटील यांच्यानंतर आतापर्यंत इतर कोणत्याही महिलेची राष्ट्रपती पदी नियुक्ती झालेली नाही.

इंदिरा गांधी यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून ओळखले जाते. त्यांची प्रतिमा कायम एक कणखर स्त्री अशी राहिली आहे. 1966 ते 1977 अशा सलग तीनवेळा त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा गांधी यांना उत्कृष्ट वक्त्या म्हणूनही ओळखले जाते.

सरोजिनी नायडू यांना उत्तर प्रदेशच्या पहिली महिला राज्यपाल होण्याचा मान मिळाला होता. त्यावेळी उत्तर प्रदेश हा विस्तार आणि लोकसंख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठा प्रांत होता. या प्रदेशाला संयुक्त प्रांत म्हणून ओळखले जात असे. सरोजिनी नायडू 1947 ते 1949 पर्यंत या संयुक्त प्रांतांच्या राज्यपाल होत्या.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामील झालेल्या सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्याचे खरे नाव सुचेता मजुमदार होते. त्यांचा कार्यकाळ 1963 ते 1967 पर्यंतचा होता.

माजी उपपंतप्रधान आणि प्रख्यात दलित नेते बाबू जगजीवन राम यांच्या कन्या मीरा कुमार लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती बनल्या होत्या. 2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या सभापती होत्या.

Nirmala Sitaraman

सरला ठकराल भारतात विमान उड्डाण करणाऱ्या पहिली महिला होत्या. 1000 तास उड्डाण केल्यानंतर त्यांना ए-ग्रेड परवाना मिळाला. सरला ठकराल केवळ 21 वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांना विमानचालकाचा परवाना मिळाला.

भावना कांत या पहिल्या महिला लढाऊ पायलट आहेत. 2016 मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी महिला वैमानिकांना फायटर पायलटच्या रूपात हवाई दलात प्रवेश करण्यास परवानगी दिली. 2019मध्ये भावना कांत भारताची पहिली महिला फायटर पायलट ठरल्या.

फातिमा बिवी यांना देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. लोअर कोर्टात त्यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

रीटा फरिया या मिस वर्ल्डचे जेतेपद मिळवणाऱ्या पहिली भारतीय आणि आशियाई वंशाच्याही पहिल्या महिला होत्या. 1996मध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती.

सुष्मिता सेन मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. 1994मध्ये तिने ही स्पर्धा जिंकली. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती.

किरण बेदी या देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आहेत. 1972 मध्ये, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयपीएससाठी त्यांची निवड झाली.

आनंदीबाई जोशी एमडी पदवी मिळविणारी आणि वेस्टर्न मेडिसिनमध्ये डॉक्टर बनणार्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्यांचे पूर्ण नाव आनंदी गोपाळ जोशी होते.