
सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोन्यात पैसे गुंतवले तर भविष्यात त्या पैशांचे मूल्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र सोन्यासोबतच आणखी एक गोष्ट तुम्हाला भविष्यात मालामाल करू शकते.

सोन्यासोबतच तुम्हाला चांदीदेखील भरपूर रिटर्न्स देऊ शकते. कारण गेल्या काही महिन्यांत चांदीचा भाव खूप वाढला आहे. भाववाढीचा हा दर सोन्यापेक्षाही जास्त आहे.

चांदी फक्त दागिनेच नव्हे तर इतरही कामांसाठी वापरली जाते. त्यामुळे चांदीच्या वाढत्या मागणीमुळे तिचा भावदेखील वाढला आहे. चांदीचा भाव सध्या दीड लाख रुपये प्रतिकिलोपेक्षाही जास्त झाला आहे.

गेल्या काही दिवसांचा अभ्यास करायचा झाल्यास सोने आणि अन्य गुंतवणू साधनांच्या तुलनेत चांदीने चांगले रिटर्न्स दिले आहेत.

या एका वर्षात चांदीचा भाव हा 75 टक्क्यांनी वाढलेला आहे. त्यामुळेच चांदी भविष्यातही अशाच पद्धतीने वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

त्यामुळे सोन्यासोबतच चांदी हादेखील धातू तुम्हाला कदाचित मालामाल करू शकतो. (टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)