
PPF मध्ये जॉइंट अकाऊंटची सुविधा नसते. पण पति आणि पत्नी दोघे आपपाल्या नावाने वेगवेगळी अकाऊंट उघडू शकतात. दोघांनी जर वर्षाला प्रत्येकी 1.50 लाख जमा केले तर वर्षाची गुंतवणूक एकूण 3 लाख रुपये होते.

दोघे जर वर्षाला 1.50 लाख रुपये म्हणजे प्रति महिना 12,500 रुपये गुंतवत असतील, तर 20 वर्षात एकूण गुंतवणूक 60 लाख रुपये होते. 7.1 टक्के व्याज दरावर कंपाऊंड इंटरेस्टने ही रक्कम जवळपास ₹1.33 कोटी रुपये होते. म्हणजे पती-पत्नी मिळून आरामात कोट्याधीश बनू शकतात. ते सुद्धा कुठल्या मार्केट रिस्क शिवाय.

पीपीएफ गुंतवणूकीवर 'E-E-E' टॅक्स बेनिफिटची सुविधा मिळते. गुंतवणूक टॅक्स-फ्री (80C मध्ये सवलत), व्याज टॅक्स-फ्री आणि मॅच्योरिटी अमाउंट सुद्धा टॅक्स-फ्री असते. याचा अर्थ संपूर्ण ₹1.33 कोटी रुपये तुमचे असतील. सरकारला एक पैसाही टॅक्समध्ये द्यावा लागणार नाही.

पीपीएफ अकाउंट 15 वर्षांनी मॅच्योर होतं. पण ते तुम्ही 5-5 वर्षाच्या ब्लॉकने वाढवू शकता. मॅच्योरिटीच्या एक वर्षाच्या आत फॉर्म-H जमा करा. यामुळे तुमचं अकाउंट सुरु राहील आणि व्याजही मिळेल. या एक्सटेंशनमुळे तुमचा फंड वेगाने वाढून कोट्यवधी रुपयापर्यंत पोहोचू शकतो.

पीपीएफ पूर्णपणे सरकारी गॅरेंटीची स्कीम आहे. यात शेअर बाजाराचे चढ-उतार नाहीत किंवा पैसे बुडण्याची भिती नाही. दरवर्षी व्याज कंपाऊंड होऊन वाढत राहील. व्याज कंपाऊंड होऊन वाढत असल्याने तुमचा पैसा वाढतो. विवाहित जोडप्यांच सुरक्षित भविष्य आणि टॅक्स फ्री फंड बनवण्याची ही एक विश्वासू पद्धत आहे.