
शेअर बाजारातील काही कंपन्यांनी त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. त्यात डिव्हिडंडची घोषणा करुन गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.

तिमाही निकाल करत या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लाशांशाची भेट पण जाहीर केली आहे. या कंपन्यांनी लाभांश जाहीर केल्यानंतर तो काही दिवसांत खात्यात जमा होतो.

KIFS Financial Services कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. त्यांनी शेअरधारकाला लाभांश जाहीर केला आहे. कंपनी 1.40 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देईल.

सिमेंट क्षेत्रातील सह्याद्री इंडस्ट्रीजने शेअरधारकांना गुडन्यूज दिली आहे. कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर एक रुपयांचा डिव्हिडंड देणार आहे.

आयटी क्षेत्रातील कंपनी डब्ल्यू ईपी सोल्यूशन्स गुंतवणूकदारांना 0.50 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश देणार आहे.

Solitaire Machine Tools कंपनीने डिव्हिडंड देण्याची घोषणा केली. कंपनी गुंतवणूकदारांना 1.75 रुपयांचा लाभांश देणार आहे. तर आंध्रा पेट्रोकेमिकल्स गुंतवणूकदारांन 2 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश देईल.