PHOTO | एकीकडे विजयाचा जल्लोष, दुसरीकडे पुत्रप्राप्तीचा आनंद, हैदराबादचा गोलंदाज बाबा बनला

| Updated on: Nov 07, 2020 | 7:25 PM

बंगळुरुविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात या गोलंदाजाने 4 ओव्हरमध्ये 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

1 / 4
सनराजयजर्स हैदराबादसाठी शुक्रवार दुहेरी आनंदाचा दिवस ठरला. एलिमिनेटर सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर 6 विकेट्सने मात करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. तसेच हैदराबादचा वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजन बाबा झाला. थंगारासूची पत्नी पवित्राने शुक्रवारी सकाळी बाळाला जन्म दिला. या पार्श्वभूमीवर हैदराबादने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन थंगारासू आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 4
बंगळुरुवर विजय मिळवल्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ही गोड माहिती दिली. "शुक्रवारी सकाळी थंगारासूला पुत्रप्राप्ती झाली, अशी माहिती वॉर्नरने दिली. तसेच या नवजात शिशूसाठी विजयापेक्षा आणखी कोणती चांगली भेट असू शकते", असंही वॉर्नर म्हणाला.

3 / 4
नटराजनने एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुविरुद्धात 4 ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने 33 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने एबी डी व्हीलियर्सची महत्वाची विकेट घेतली. नटराजनने एबीला अचूक यॉर्कर टाकर बोल्ड केलं.

4 / 4
थंगारासूने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील एकूण 15 सामन्यात एकूण 16 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. दरम्यान हैदराबाद आता 8 नोव्हेंबरला क्वालिफायर  2 मध्ये दिल्लीविरुद्ध भिडणार आहे.