
श्रेयस अय्यर तसा शांत खेळाडू आहे. पण काल राजस्थान रॉयल्सने धावांचा पाठलाग करण्याचं जे मोठं टार्गेट दिलं होतं, त्याचा दबाव श्रेयस अय्यरवर दिसून आला. सामना रंगतदार वळणावर असताना वेंकटेश दुसरी धाव धावला नाही, त्यावरुन श्रेयस त्याच्यावर वैतागला.

केकेआरच्या डावात 16 व्या षटकात धाव घेण्यावरुन श्रेयस अय्यर वेंकटेशवर वैतागला. वेंकटेशने डीप पॉईंटच्या दिशेने बॉल फटकावला. त्याने सिंगल धाव घेतली. पहिली धाव घेतल्यानंतर श्रेयसला दुसरी धाव घेण्याची संधी दिसली. आधी वेंकटेशने सकारात्मक प्रतिसाद दिला.

पण श्रेयस खेळपट्टीच्या मध्यापर्यंत आल्यानंतर वेंकटेशने त्याला माघारी धाडले. श्रेयस वेळत क्रीझमध्ये पोहोचला व रन आऊटची संधी दिली नाही. त्यानंतर श्रेयस लगेच वेंकटेशवर वैतागला.

श्रेयस केकेआरचे कोच ब्रॅन्डन मॅक्कलम यांच्यावरही नाराज दिसला. पॅव्हेलियनमध्ये परत जाताना त्याने कुठल्यातरी विषयावरुन मॅक्कलम यांच्याबरोबर वाद घातला.

व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर हेड कोच ब्रँडन मॅक्कलम यांच्याकडे कुठल्यातरी विषयाची तक्रार करताना दिसतोय. मॅक्कलम डगआऊटमध्ये बसले होते.