
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचं हे 16 वं पर्व आहे. या सिझनमध्ये सर्वात वयस्कर कर्णधार धोनी असणार आहे. त्याचं वय 41 वर्षे आहे. (Photo - BCCI)

धोनी पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यांचा क्रमांक लागतो. त्याचं वय या स्पर्धेत 38 वर्षे इतकं आहे. (Photo - Twitter)

शिखर धवन वयस्कर कर्णधारांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स कर्णधारपद भूषविताना त्याचं वय 37 वर्षे इतकं आहे. (Photo- Twitter)

डेविड वॉर्नर हा दिल्ली कॅपिटल्सची धुरा सांभाळणार आहे. त्याचं वय 36 वर्षे आहे. (Photo - BCCI)

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. त्याचं वय आता 35 वर्षे आहे. (Photo - Twitter)

केएल राहुलकडे लखनऊ सुपर जायन्ट्सची धुरा आहे. त्याचं वय 30 वर्षे आहे. (Photo- IPL)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गतवर्षी गुजरातनं जेतेपद पटकावलं होतं. यंदा कर्णधारपदाचं त्याचं दुसरं वर्ष आहे. त्याचं वय 29 वर्षे इतकं आहे. (Photo- Instagram)

कोलकाता नाईट राईडर्सनं कर्णधारपदाची धुरा नितीश राणा याच्याकडे सोपवली आहे. नितीश राणाचं वय 29 वर्षे इतकं आहे. (Photo- KKR Twitter)

एडन मार्करम सनराईजर्स हैदबादचं कर्णधारपद भूषविणार आहे. एडम मार्करम हा स्पर्धेतील तरुण विदेशी कर्णधार आहे. त्याचं वय 28 वर्षे आहे. (Photo- IPL)

आयपीएलमध्ये युवा कर्णधार म्हणून संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळणार आहे. त्याचं वय 28 वर्षे इतकं आहे. (Photo- BCCI)