
क्रिस गेल : इंडियन प्रीमियर लीगच्या एका हंगामात (IPL Season) सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड क्रिस गेल याच्या नावावर आहे. वेस्टइंडिजचा माजी दिग्गज फलंदाज गेल याने वर्ष 2012 मध्ये आयपीएलच्या 14 सामन्यात 59 षटकार ठोकले आहेत. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघात होता.

आंद्रे रसेल : या यादीत दुसर्या क्रमांकावर वेस्टइंडीजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेल हा आहे. रसेल याने आयपीएल 2019 मध्ये 13 सामन्यात 53 षटकार ठोकले. तो कोलकत्ता नाईट रायडर्ससाठी खेळत होता.

जोस बटलर : इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने आयपीएल 2022 मध्ये 17 सामान्यांमध्ये 42 षटकार ठोकण्याची कमाल केली. बटलर त्यावेळी राजस्थान रॉयल्समध्ये होता. तो आयपीएलच्या या हंगामात गुजरात टायटन्स संघाकडून खेळत आहे.

अभिषेक शर्मा : सनरायझर्स हैदराबादचा तरुणा, तडफदार, सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे या यादीत असणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 42 षटकार ठोकले.

विराट कोहली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 2016 मध्ये आयपीएल हंगामात 16 सामन्यात 38 षटकार लगावले. तांत्रिक खेळात तो अग्रेसर आहे.