
आमिर खान याची लेक इरा खान ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये इरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा हा पार पडला. या साखरपुड्याला अत्यंत खास लोक उपस्थित होते.

आता साखरपुड्यानंतर इरा खान हिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. इरा खान हिचे लग्न 3 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी देखील सुरू आहे.

इरा खान हिचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी आता इरा खान हिने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्यातील अत्यंत खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये दोघेही रोमंटिक दिसत आहेत.

हे फोटो शेअर करत इरा खान हिने लिहिले की, तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात चांगल्या निर्णयाला भेटलात का? त्याने माझे मन भरवले आहे. यासोबत तिने काही खास फोटोही शेअर केले.

इरा खान हिने हे शेअर केलेले फोटो तिच्या साखरपुड्यातील आहेत. आता इरा खान हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.