
आमिर खान याची लेक इरा खान ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. इरा खान ही नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न करणार आहे. अनेक वर्षे नुपूर आणि इरा यांनी एकमेकांना डेट केलंय.

इरा खान ही कायमच नुपूर शिखरे याच्यासोबत खास फोटो शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच हे राजस्थानमध्ये धमाल करताना देखील दिसले.

आता नुकताच ईरा खान हिने काही खास फोटो हे शेअर केले आहेत. लग्नाच्या अगोदरच्या कार्यक्रमांना सुरूवात झाल्याचे या फोटोंवरून दिसत आहे.

इरा खान हिचा या फोटोंमध्ये जबरदस्त लूक दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच लग्नाची खरेदी करताना ईरा खान ही स्पाॅट झाली होती.

ईरा खान आणि नुपूर यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. ईरा खान ही सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसतंय.