बॉलिवूड सोडा साऊथचे हे 5 चित्रपट एकट्यानेच बघावे, प्रत्येक चित्रपट…

बॉलिवूड सोडा साऊथ इंडस्ट्रीमधील हे पाच बोल्ड चित्रपट, जे तुम्ही एकट्यानेच पाहावेत. शेवटचा तर प्रचंड चर्चेत.

| Updated on: Feb 28, 2026 | 4:32 PM
1 / 6
साऊथ इंडियन सिनेमा म्हटलं की डोळ्यासमोर मोठ्या प्रमाणावर सादर केलेले अ‍ॅक्शन सीन्स, भावनिक कौटुंबिक कथा किंवा भव्यदिव्य सादरीकरण उभं राहतं. मात्र प्रत्येक साऊथ चित्रपट हा कुटुंबासोबत बसून पाहण्यासारखाच असेल असं नाही.

साऊथ इंडियन सिनेमा म्हटलं की डोळ्यासमोर मोठ्या प्रमाणावर सादर केलेले अ‍ॅक्शन सीन्स, भावनिक कौटुंबिक कथा किंवा भव्यदिव्य सादरीकरण उभं राहतं. मात्र प्रत्येक साऊथ चित्रपट हा कुटुंबासोबत बसून पाहण्यासारखाच असेल असं नाही.

2 / 6

काही चित्रपटांनी आपल्या धाडसी विषयांमुळे आणि प्रौढ आशयामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. थरार, सस्पेन्स आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांबरोबरच प्रौढ दृश्यांमुळे हे चित्रपट कुटुंबासोबत पाहू शकत नाही. अशाच काही चित्रपटांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

3 / 6

सुपर डीलक्स: विजय सेतुपती, फहद फासिल आणि सामंथा रुथ प्रभू यांसारख्या कलाकारांनी सजलेला हा डार्क कॉमेडी प्रकारातील वेगळा प्रयोग मानला जातो. चित्रपटाचा बेधडक दृष्टिकोन आणि पारंपरिक चौकटीबाहेरची मांडणी यामुळे तो प्रौढ प्रेक्षकांसाठी अधिक योग्य ठरतो.

4 / 6

टिल्लू स्क्वायर: सिद्धू जोन्नलगड्डा अभिनित हा तेलुगू रोमँटिक-कॉमेडी चित्रपट विनोद, मिश्कील प्रसंग आणि प्रौढ आशयामुळे तरुणांमध्ये लोकप्रिय ठरला. हलक्या-फुलक्या पण बोल्ड विनोदामुळे हा चित्रपट कौटुंबिक प्रेक्षकांसाठी नाही तर प्रामुख्याने तरुण प्रेक्षकांसाठी आहे.

5 / 6

आरएक्स 100: कार्तिकेय गुम्माकोंडा अभिनित हा ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित प्रेमकथेतून सूड आणि विश्वासघाताची कथा सांगतो. धक्कादायक वळणं, तीव्र भावना आणि काही बोल्ड दृश्यांमुळे हा चित्रपट प्रौढ प्रेक्षकांसाठीच बनवण्यात आला आहे.

6 / 6

इरुट्टू अरयिल मुरट्टू कुथु: हा एक अ‍ॅडल्ट हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. बोल्ड विनोद, लैंगिक संदर्भ आणि अलौकिक ट्विस्ट यांचा संगम यात पाहायला मिळतो. पूर्णपणे प्रौढ मनोरंजनासाठी तयार केलेला हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यास योग्य नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us