Iron Hacks : इस्त्रीचा वापर फक्त कपड्यांसाठी नाही; घरातील ‘या’ कामांसाठीही ठरेल फायदेशीर

घरात असलेल्या इस्त्रीचा उपयोग केवळ कपड्यांवरील सुरकुत्या घालवण्यासाठीच होत नाही. योग्य काळजी घेतली तर ती बहुपयोगी ठरू शकते. जाणून घेऊया इस्त्रीचे विविध उपयोग.

| Updated on: Sep 29, 2026 | 6:59 PM
1 / 10
इस्त्री म्हटलं आपल्याला सगळ्या पहिले आठवतं ते कपड्यावरील सुरकुत्या दूर करण्याचं काम. मात्र, घरात वापरली जाणारी ही साधी इस्त्री केवळ कपड्यांपुरती मर्यादित नाही. तिच्या उष्णतेचा आणि काही इस्त्रींमध्ये उपलब्ध असलेल्या वाफेचा उपयोग घरातील विविध छोट्या कामांसाठीही करता येतो. (All photos : Social Media)

इस्त्री म्हटलं आपल्याला सगळ्या पहिले आठवतं ते कपड्यावरील सुरकुत्या दूर करण्याचं काम. मात्र, घरात वापरली जाणारी ही साधी इस्त्री केवळ कपड्यांपुरती मर्यादित नाही. तिच्या उष्णतेचा आणि काही इस्त्रींमध्ये उपलब्ध असलेल्या वाफेचा उपयोग घरातील विविध छोट्या कामांसाठीही करता येतो. (All photos : Social Media)

2 / 10

अनेकदा घरातील काही वस्तूंवर असे डाग किंवा ठसे पडतात, जे साफ करणं कठीण वाटतं. अशा काही परिस्थितींमध्ये इस्त्री उपयोगी ठरू शकते. मात्र, तिचा वापर करताना वस्तूच्या मटेरियलनुसार तापमान ठेवणं आणि योग्य ती काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

3 / 10

मुलं घरात खेळताना कधी-कधी कपड्यांवर किंवा इतर वस्तूंवर क्रेयॉनने खुणा करतात. क्रेयॉनमध्ये मेण असल्यामुळे योग्य उष्णतेने ते मऊ करता येतं. जिथे जाग पडला असेल तिथे एखादा संरक्षक कागद ठेवून कमी तापमानाच्या इस्त्रीचा वापर करता येतो. मात्र, ही पद्धत वापरण्यापूर्वी छोट्या आणि नजरेस न येणाऱ्या भागावर चाचणी घ्यायला विसरू नका.

4 / 10

मेणबत्तीचे मेण हे कधीतरी कपडे, टेबलक्लॉथ किंवा कार्पेटवर पडलं तर ते थेट घासल्यामुळे डाग आणखी पसरू शकतो. मेण थंड झाल्यानंतर त्यावर पातळ कागद किंवा योग्य कापड ठेवावं. त्यानंतर कमी तापमानावर इस्त्री काही वेळ फिरवल्यास मेण मऊ होऊ शकते. कागद मऊ झालेले मेण शोषून घेण्यास मदत होईल.

5 / 10

लाकडी टेबलवर ओला ग्लास ठेवल्यामुळे अनेकदा पांढरे गोलाकार ठसे पडतात. काही प्रकारच्या अशा ठशांवर हलकी उष्णता उपयोगी ठरू शकते. ठशावर पातळ कापड ठेवून अतिशय कमी तापमानावर इस्त्रीचा वापर करता येतो. इस्त्री एकाच ठिकाणी जास्त वेळ ठेवू नये.

6 / 10

जुना स्टिकर काढल्यानंतर त्याचा चिकटपणा किंवा गोंद पृष्ठभागावर राहतो. तो खरवडण्याऐवजी हलक्या उष्णतेने तो गम किंवा गोंद मऊ करता येतो. त्यानंतर तो काळजीपूर्वक साफ करता येतो. विशेषतः लाकूड, प्लास्टिक किंवा पॉलिश केलेल्या वस्तूंवर थेट गरम इस्त्री लावू नये.

7 / 10

जड पडदे वारंवार काढून इस्त्री करणं कठीण असतं. इस्त्रीमध्ये स्टीमची सुविधा असल्यास काही प्रकारच्या पडद्यांवरील सुरकुत्या पडदे लावलेल्या स्थितीतच कमी करता येतात. मात्र, पडद्याच्या कापडानुसार योग्य तापमान आणि स्टीमचा वापर करणं आवश्यक आहे.

8 / 10

कपड्याला छोटं छिद्र पडलं असेल किंवा एखादा भाग थोडा सुटला असेल, तर Iron-on Patchचा वापर करता येतो. पॅच योग्य ठिकाणी ठेवून त्यावर इस्त्री केल्यास तो कपड्याला चिकटू शकतो. हे काम करताना पॅचच्या पॅकेटवर दिलेल्या सूचनांनुसारच तापमान आणि इस्त्रीचा वापर करावा.

9 / 10

जड फर्निचर बराच काळ एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे कार्पेटचे तंतू दबले जातात. फर्निचर हटवल्यानंतर त्या ठिकाणी ठसे दिसू शकतात. योग्य प्रमाणात ओलावा आणि हलकी उष्णता वापरल्यास काही प्रकारच्या कार्पेटवरील दबलेले तंतू पुन्हा व्यवस्थित होण्यास मदत होऊ शकते.

10 / 10

इस्त्री खूप जास्त तापमानापर्यंत गरम होते. त्यामुळे कोणत्याही पृष्ठभागावर ती वापरण्यापूर्वी आधी तापमान तपासणं आवश्यक असतं. एखादं नाजूक कापड, प्लास्टिक, पॉलिश केलेलं फर्निचर किंवा कृत्रिम मटेरियलवर थेट उष्णता दिल्यास नुकसान होण्याची शक्यता असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us