
दूध पिणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूध पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, दुधामध्ये आपण अजून काही घटक मिक्स करून दूध पिल्याने आरोग्याला फायदे मिळतात.

कायमच दूध साधे पिण्यापेक्षा दुधात हळद मिक्स करून प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हेच नाही तर ताकद वाढण्यासही मदत होते. हळद निरोगी ठेवण्यास मदत करते.

चिया सीड्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मात्र, चिया सीड्स नुसत्या खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी दुधामध्ये चिया सीड्स मिक्स करून खाल्ल्याने फायदा मिळतो.

दालचिनी देखील आपण दुधात मिक्स करू पिऊ शकता. दूध आणि दालचिनी मिक्स करून पिलयाने ऊर्जा वाढण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाणही संतुलित होते आणि पचन सुधारते.

सर्वांनाच माहिती आहे की, आयुर्वेदात लवंगला अत्यंत महत्व आहे. लवंगाचा वापर वेदनांपासून त्वरित आराम देण्यासाठी केला जातो. दात आणि हिरड्याचा होणार त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे दुधात लवंग मिक्स करून प्या.