प्लास्टिकची बाटली किंवा ड्रममध्ये पेट्रोल साठवणे योग्य की अयोग्य? नियम काय सांगतात?

देशभरात पेट्रोल तुटवड्याच्या अफवांदरम्यान प्लास्टिकच्या बाटल्या आणि ड्रममध्ये इंधन साठवण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण असे करणे कायदेशीर आहे का? जाणून घ्या पेट्रोलियम कायदा १९३४ आणि त्यातील कडक नियमांबद्दल.

| Updated on: Mar 27, 2026 | 12:38 PM
1 / 6
मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर पेट्रोल तुटवडा असल्याच्या अफवा पसरताना दिसत आहे. या भीतीपोटी अनेक नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करून पाण्याच्या टाक्या, प्लास्टिकचे ड्रम आणि बाटल्यांमध्ये पेट्रोल भरून त्याची साठवणूक करताना दिसत आहेत.

2 / 6
तुम्हीही जर प्लास्टिकच्या बाटल्या किंवा ड्रममध्ये पेट्रोल भरून त्याची साठवणूक करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकते. पेट्रोल किंवा इतर इंधनाची साठवणूक करणे हे केवळ जीवावर बेतू शकत नाही, तर यामुळे तुम्हाला तुरुंगाची हवाही खावी लागू शकते.

3 / 6
भारतात पेट्रोलची विक्री, साठवणूक आणि वाहतूक ही पेट्रोलियम कायदा, १९३४ आणि पेट्रोलियम नियम, २००२ द्वारे नियंत्रित केली जाते. या कायद्यानुसार, पेट्रोल पंपांना उघड्या भांड्यांमध्ये, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई आहे.

4 / 6
पेट्रोल फक्त वाहनाच्या इंधन टाकीत किंवा इंधन साठवण्यासाठी विशेष मान्यता प्राप्त धातूच्या (Metal) कंटेनरमध्येच भरता येते. पेट्रोल हे अतिशय वेगाने पेट घेणारे इंधन आहे. सामान्य प्लास्टिकच्या बाटल्या किंवा ड्रममध्ये अंतर्गत दाब (Internal Pressure) सहन करण्याची क्षमता नसते.

5 / 6
प्लास्टिकमध्ये स्थिर विद्युत प्रभार (Static Electricity) निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. साठवणूक करताना निर्माण झालेली एक लहान ठिणगीही भीषण स्फोट घडवून आणू शकते. पेट्रोल प्लास्टिकला विरघळवू शकते किंवा कमकुवत करू शकते, ज्यामुळे इंधन गळती होऊन मोठी आग लागण्याची भीती असते.

6 / 6
जर एखादा पेट्रोल पंप असुरक्षित भांड्यात इंधन देताना आढळला, तर त्यांचा परवाना तात्काळ निलंबित किंवा रद्द केला जाऊ शकतो. तसेच अवैध साठवणूक किंवा धोकादायक पद्धतीने इंधनाची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला मोठा दंड भरावा लागू शकतो. त्यासोबतच, दोषी आढळल्यास ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते.

Follow Us