
व्हेनेझुएला गंभीर आर्थिक संकटात आहे. येथे वाढती महागाई आणि घसरत्या चलनदरात मोठी लक्षणीय घट झाली आहे.सोन्यास नेहमीच स्थानिक स्तरावर काढले जाते.आणि एक्स्चेंज रेटमध्ये विकले जाते. भारतीय बाजारात मात्र सोने प्रचंड महाग आहे.

भारतात एक ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे १३,८२७ रुपये आहे.व्हेनेझुएलात भारतीय चलनात त्याच शुद्धतेच्या सोन्याची किंमत १८१.६५ रुपये आहे. याचा अर्थ व्हेनेझुएलात सोने त्याच किंमतीत मिळते ज्या किंमतीत भारतात एखाद्या रेस्टॉरंटमध्ये चहा वा कॉफी मिळते.

भारतीय कस्टम ड्यूटी फ्री सोने तेव्हाच आणू देते जेव्हा तुम्ही किमान एक वर्षे परदेशात राहिलेला असाल. अशा प्रकरणात पुरुष प्रवासी २० ग्रॅमपर्यंत सोने आणू शकतात. तर महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंत सोने आणू शकतात. ही सूट सोन्याच्या दागिन्यांवरच लागू असते सोन्याचा बार आणि नाण्यांवर लागू नसते.

जर तुम्ही सहा महिन्यांहून जास्त वेळ परदेशात राहिला असाल तर तर तुम्हाला प्रति प्रवासी एक किलोग्रॅम पर्यंत सोने आणण्याची मुभा आहे, परंतू तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल. ही कस्टम ड्यूटी सध्या नियमांआधारे ६ ते १५ टक्क्यांदरम्यान असते.

सोन्याची नाणी, बिस्कीट वा बारवर कोणतीही ड्यूटी फ्रीची सुट दिली जात नाही. टॅक्स पहिल्या ग्रॅमपासूनच लागू होतो. याच सोबत हिरे, मोती वा मुल्यवान रत्ने देखील संबंधित ज्वेलरीवर देखील ड्यूटी फ्री अलाऊन्स मिळत नाही

जर तुमच्या जवळ असलेले सोने एका मर्यादेबाहेर असेल तर तुम्हाला एअरपोर्टवर रेड चॅनलवर या संबंधी जाहीर करावे लागेल. जर जाहीर केले नाही तर ते सोने जप्त केले जाऊ शकते आणि मोठा दंड लावला जाऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.