जगातली सर्वात महागडी दारू, एका बॉटलची किंमत तब्बल 52 कोटी, दारूमध्ये नेमकं काय आहे?

या जगात एक खास व्हिस्की आहे. या व्हिस्कीची किंमत तब्बल 52 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे ही व्हिस्की पिणाऱ्यांची संख्यादेखील खूपच जास्त आहे. त्यामुळे या व्हिस्कीमध्ये नेमकं काय आहे, जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 11, 2026 | 12:49 AM
1 / 5
जगात अनेक प्रकारची दारू आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मद्ये पिणारे मद्यशौकीनही बरेच आहेत. तुम्हाला बिअर, रम, व्होडका, व्हिस्की अशी वेगवेगळ्या प्रकारची मद्ये पाहायला मिळतात. यातील काही मद्यांची किंमत तर हजारो रुपये असते. श्रीमंत, अतिश्रीमंतांच्या कार्यक्रमात अशी महागडी मद्ये आवडीने प्राशन केली जातात. (Photo Credit : isabellas islay official website)

2 / 5
परंतु जगात असे एक मद्य आहे, ज्याची किंमत अनेक कोटी रुपयांत आहेत. ही व्हिस्की जगातील सर्वात महागडी व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव 'इसाबेला इस्ले' असे आहे. या व्हिस्कीच्या एका बॉटलची किंमत तब्बल 60 लाख डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : isabellas islay official website)

3 / 5
भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास इसाबेल इस्ले या व्हिस्कीची एक बॉटल तब्बल 52 कोटी रुपयांना मिळते. ही व्हिस्की ज्या बॉटलमधून दिली जाते, ती फारच विशेष आहे. सोबतच इसाबेला इस्ले ही व्हिस्कीदेखील खूपच जुनी आणि प्रीमियम असते. त्यामुळेच इसाबेला इस्ले या व्हिस्कीच्या एका बॉटलची किंमत 52 कोटी रुपये आहे. (Photo Credit : isabellas islay official website)

4 / 5
 या व्हिस्कीची बॉटल फारच खास आहे. ही बॉटल हिरेजडीत आहे. तिच्यावर 8500 पेक्षा जास्त हिरे आणि 300 माणिक आहेत. सोबतच त्यावर सोनंदेखील आहे. विशेष म्हणजे या बॉटलवरील हिरे खरेदी करणाऱ्याच्या आवडीनुसार बदलता येतात. व्हिस्कीची ही बॉटल लाकडाच्या एका अत्यंत महागड्या अशा पेटीत ठेवली जाते. (Photo Credit : isabellas islay official website)

5 / 5
इसाबेला इस्ले या व्हिस्कीची एक किंमत साधारण 52 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या बॉटलमध्ये 750 एमएल व्हिस्की असते. एका पेगमध्ये 30 एमएल व्हिस्की टाकली तर साधारण 2 कोटी रुपयांना एक पेग पडतो. म्हणूनच ही व्हिस्की खूपच खास आहे. (Photo Credit : isabellas islay official website)