Isha Ambani यांच्या हँड पर्सवर ३,०२५ हिरे जडलेले, किंमत ऐकून अवाक व्हाल

उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी पॅरीसच्या एका फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. या सोहळ्याला उपस्थित रहाताना त्यांच्या हातातील पर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले,या पर्सवर तब्बल ३,०२५ हिरे जडले होते. किती आहे या पर्सची किंमत पाहूयात...

| Updated on: Jul 11, 2026 | 5:24 PM
1 / 5
 उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी पॅरीसच्या Haute Couture फॅशन वीकमध्ये  सहभाग घेतला होता. या शोमध्ये ईशा अंबानी यांच्या हातात असलेल्या Birkin पर्सवर तब्बल ३,०२५ हिरे जडलेले होते.

उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी पॅरीसच्या Haute Couture फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ईशा अंबानी यांच्या हातात असलेल्या Birkin पर्सवर तब्बल ३,०२५ हिरे जडलेले होते.

2 / 5

उद्योजक मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांनी पॅरीसच्या Haute Couture फॅशन वीकमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ईशा अंबानी यांच्या हातात असलेल्या Birkin पर्सवर तब्बल ३,०२५ हिरे जडलेले होते.

3 / 5

ईशा अंबानी पॅरिस हाऊट कूटूर फॅशन वीकमध्ये आतापर्यंतची सर्वात महागडी बर्किन बॅग घेऊन आल्या होत्या. ६ जुलै रोजी राहुल मिश्रा यांच्या रनवे शोमध्ये अंबानी 'हर्मेस बर्किन सॅक बिजू' ही बॅग हातात घेऊन उपस्थित होत्या. पिअर हार्डी ( Pierre Hardy ) यांनी डिझाइन केलेली ही पर्स 'मेसन'च्या 'हाउट बिजूटेरी कलेक्शन'चा एक भाग आहे.

4 / 5

केवळ काही इंच उंची असलेली ही हँडबॅग १८ - कॅरेटच्या शुद्ध पांढऱ्या सोन्यापासून तयार केलेली आहे, त्यावर एकूण १११ कॅरेटहून अधिक वजनाचे ३,०२५ 'ब्रिलियंट-कट' हिरे हाताने जडवण्यात आले आहेत.

5 / 5

ईशा अंबानी यांच्या हँड पर्सवर 'बेझल-सेट' पद्धतीने बसवलेले हे गोल आकाराचे हिरे एकमेकांशी संलग्न आहेत. तसेच 'Sotheby'ने सांगितल्याप्रमाणे, "या बॅगच्या वरच्या भागावर मगरीच्या कातडी सारखा कृत्रीम टेक्श्चर हुबेहूब साकारण्यात आला आहे, तर बॅगच्या मुख्य भागावर हिरे जडवलेले आहेत. ही हॅण्ड पर्स ईशा अंबानी यांची नसून त्यांची आई उद्योजक निता अंबानी यांची असल्याचे म्हटले जाते. या हँड पर्सची किंमत तब्बल २ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us