22 वर्षाच्या सुंदर तरुणीचा 60 वर्षांचा नवरा, गोल्ड डिगर म्हणून होतेय ट्रोल, प्रेम कसं जडलं?

सध्या एका 22 वर्षीय तरुणीची सगळीकडे चर्चा होत आहे. ती चक्क 60 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. या दोघांनही लग्नदेखील केलं आहे. परंतु आता या तरुणीला खूपच ट्रोल केलं जातंय.

| Updated on: Jan 12, 2026 | 6:41 PM
1 / 5
प्रेम कधी आणि कोणावर होईल हे सांगता येत नाही. प्रेमाला वयाची आणि प्रदेशाची अट नसते, असे म्हटले जाते. सध्या अशाच एका अजब प्रेमाची आणि प्रेमातून झालेल्या लग्नाची चर्चा होत आहे. इटलीमध्ये अवघ्या 22 वर्षांची सुंदर तरुणी चक्क 60 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. या दोघांनीही लग्न केले आहे.

2 / 5
इटलीमध्ये मिनिया पाग्नी नावाची 22 वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. सध्या ती जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिने एका 60 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न केले आहे. सोशल मीडियावर मात्र तिला खूपच ट्रोल केले जात आहे. तू पैशासाठी लग्न केले आहेस. तू गोल्ड डिगर आहेस, असे म्हणत तिला हिनवले जात आहे.

3 / 5
मिनिया आणि 60 वर्षीय मास्सीमो यांची पाच वर्षांपूर्वी भेट झाली होती. मास्सिमो मिनियाचे कधीकाळी शिक्षक होते. शाळेत असल्यापासून मिनियाला मिस्सिमो आवडायचे. शिक्षण झाल्यानंतर या दोघांचा एकमेकांशी संपर्क तुटला. परंतु नंतर एका बुकस्टोअरमध्ये हे दोघे एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले.

4 / 5
हे दोघे प्रेमात पडल्यानंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं. आपल्या घरचे या नात्याला स्वीकारतील की नाही, अशी शंका मिनियाला होती. परंतु मुलीच्या प्रेमाचा तिच्या आई-वडिलांनी स्वीकार केला. आता मिनिया आणि मास्सिमो दोघेही आनंदाने एकमेकांसोबत राहतात.

5 / 5
दरम्यान, तिला आता गोल्ड डिगर म्हटलं जातंय. परंतु तिने ट्रोलर्सना जशास तसे उत्तर दिले आहे. प्रत्येक नाते हे पैशाला केंद्रस्थानी ठेवूनच तयार झालेले नसते. मी एक स्वतंत्र स्त्री आहे, असे म्हणत तिने आल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तिच्या लग्नाची मात्र सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.