स्वामींचं वारुळातून होणार दिव्य प्राकट्य; भक्तांना भावूक करणारा प्रकट दिन विशेष भाग

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतील प्रकट दिन विशेष भाग प्रेक्षकांना श्रद्धा, संघर्ष आणि दिव्य पुनरागमनाचा नेत्रदीपक अनुभव देत मालिकेच्या महत्त्वाच्या मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या 20 मार्च रोजी हा एपिसोड प्रसारित होणार आहे.

| Updated on: Mar 19, 2026 | 4:16 PM
1 / 6
कलर्स मराठी वाहिनीवरील 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत येत्या 20 मार्च रोजी प्रसारित होणारा प्रकट दिन विशेष भाग हा मालिकेच्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. दुष्काळाने होरपळलेल्या गावात पाण्याच्या एका थेंबासाठी सुरू झालेला संघर्ष, ब्रिटिश सरकारच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या रणजीत सावकारचा गावकऱ्यांवर अमानुष अत्याचार आणि स्वामींच्या भक्तांची आर्त हाक या सगळ्यांचा परमोच्च बिंदू या विशेष पर्वात पाहायला मिळणार आहे.

2 / 6
विशेष म्हणजे, स्वामींचं वारुळातून होणारं दिव्य प्राकट्य, वारुळाचं फुलाला टेकण्याचा अद्भुत क्षण आणि त्यानंतर त्याच वारुळातून उलगडणारा अलौकिक चमत्कार हा या भागाचा आत्मा ठरणार आहे. काय घडणार? भक्तीची शक्ती आणि गावकऱ्यांची स्वामींवरील श्रद्धा - याने ब्रिटिश सरकारच्या मुजोरीला तडा जाईल का? स्वामींच्या परतण्याने काय बदल घडणार? हे 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा' या मालिकेच्या प्रकट दिन विशेष भागात पहायला मिळणार आहे.

3 / 6
या विशेष भागात गावातला दुष्काळ पराकोटीला पोहोचलेला असताना रणजीत सावकार गावातल्या विहिरीवर स्वतःचा हक्क सांगत गावकऱ्यांना पाणी नाकारतो. भक्तांची आर्त विनवणी, हरीश-सुधा-सदाशिव-ललिताचा अन्यायाविरोधात उभा केलेला लढा आणि स्वामींच्या नावाने होणारा तीव्र जयघोष यामुळे वातावरण भारलेलं असतं.

4 / 6
याच वेळी स्वामी स्थानावर एक वेगळीच दिव्य घडामोड सुरू असते. वारुळ दिवसेंदिवस वाढत फुलाच्या दिशेने सरकत असतं. सुंदरा आशेने त्या क्षणाची वाट पाहत असते जेव्हा हे वारुळ वाढत फुलाला स्पर्श करेल कारण स्वामींच्या संकेतांनुसार तेव्हाच स्वामी परत येणार.

5 / 6
अत्याचाराचा विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना रणजीत सावकार सुळावर चढवण्याचा निर्णय घेतो, अखेर निर्णायक क्षणी लोखंडी सुळाला पालवी फुटते, वारुळ फुलाला टेकताच त्यातून दिव्य प्रकाश झळकतो, वारुळाला भेगा पडतात आणि प्रचंड तेजोमय प्रकाशातून स्वामींचं भव्य प्राकट्य घडतं प्रेक्षकांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरणार आहे. हा सगळा भाग अत्यंत भावूक असणार आहे.

6 / 6
प्रकट दिन विशेष हा केवळ चमत्काराचा भाग नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा आणि सामूहिक शक्तीची जाणीव करून देणारा टप्पा आहे. एका अद्भुत शाकंबरी रूपात स्वामी प्रकट होणार, रणजीतच्या क्रौर्याला स्वामींनी दिलेली अनोखी शिक्षा, भक्तांच्या एकजुटीचं कौतुक आणि “आम्ही प्रत्यक्ष नसू, तरी आमची कृपा तुमच्या सोबत असेल” हा स्वामींचा संदेश मालिकेला नव्या दिशेने नेतो. हा विशेष भाग येत्या 20 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पहायला मिळणार आहे.

Follow Us