
जळगावच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 50 हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 90 हजार रुपयांनी वाढ झाली आहे

गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचे दर जीएसटी सह 81 हजार रुपये होते.. , यंदा दर हे जीएसटी सह 1 लाख 31 हजार रुपयांवर पोहोचले आहेत..

गेल्या वर्षी चांदीचे दर 85 हजार रुपये होते तरी यंदा चांदीचे दर हे एक लाख 75 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे आज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे

सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रूपयांनी घसरण झाली असून तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांनी घसरण झाली आहे.

अवघ्या पंधरा मिनिटात चांदी पुन्हा एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. एकाच दिवसात चांदीत 6 हजार रुपयांची मोठी घसरण झाली.

सोन्याचे दर विना जीएसटी एक लाख 28 हजार रुपयांवर आले आहे तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 69 हजार रुपयांवर आले आहेत. सोन्याने चांदीच्या दरात झालेली वाढ ही ग्राहकांवर देखील परिणामकारक ठरले असून यंदा दिवाळीत खरेदी करणारे महिला गृहिणींचे खरेदीचे बजेट कोलमडले आहे

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनेक जण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात. मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकांनी बजेट कोलमडल्याच सांगत भाव कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.