
मध्य-पूर्वेत 12 दिवसांनी शांतता नांदली आहे. इस्त्रायल-इराणमध्ये यु्द्धबंदी झाल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. ही वार्ता पसरताच शेअर बाजारात चैतन्य दिसले. तर जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदी स्वस्त झाली.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला. मागणी घटल्याने जगभरात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात आठवडाभरानंतर मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात तब्बल 1600 रूपयांनी तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 219 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार 180 रुपयांवर पोहोचले आहे

इराण आणि इजराइल यांच्यातील पेटलेल्या युद्धामुळे परिणामी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

नुकताच युद्ध थांबवण्यासंदर्भात चर्चा सुरू होऊन सीज फायर ची घोषणा झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचे म्हणणं आहे.

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात पहायला मिळत आहे.