Jamun Fruit : जांभूळ खाल्ल्याने शरीराला नेमके काय फायदे होतात?
जांभूळ खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. परंतु ही सामान्य माहिती आहे. आम्ही या लेखातून कोणताही दावा करत नाही.

जांभूळ खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या फळामुळे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी ठेवण्यास मदत होते.

या फळामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जांभूळ खाल्ल्याने अपचन, पोटाच्या समस्या उद्भवत नाही. तसेच पोटात गॅस होण्याच्या समस्या देखील होत नाहीत.

जांभूळात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत मिळते. जांभूळा फायबर जास्त असल्याने वजन कमी होण्यास उपयुक्त ठरते. जांभूळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच हृदय निरोगी ठेवते.

जांभळात लोह, पोटॅशियमसारखे खनिजे असतात. यात इतरही खनिजे आढळून येतात. ही खनिजे शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

जांभूळ नियमितपणे खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्याला मदत मिळते, असे मानले जाते. जांभूळ खाल्ल्याने पेशींचे संरक्षण करण्यासही मदत मिळते.