
तुमच्या बँक खात्यात शून्य बॅलन्स असला तरी तुम्हाला पैसे काढता येऊ शकतात. आता तुम्हालाही तुमच्या बँक अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स असला तरी आपत्कालीन परिस्थितीत पैसे मिळू शकतात का? कारण केंद्र सरकारने तशी योजना सुरु केली आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजने (PMJDY) मुळे हे शक्य झाले आहे. गरीब आणि सामान्य लोकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेत उघडलेल्या खात्याला किमान शिल्लक ठेवण्याची गरज नसते. पण सर्वात मोठी आणि महत्त्वाची सुविधा म्हणजे या खात्यातून तुम्हाला १०,००० पर्यंतचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकतो.

ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसतानाही बँक तुम्हाला तात्पुरती रक्कम काढण्याची परवानगी देते. ही रक्कम एक प्रकारचे छोटे कर्ज असते. हे पैसे तुम्ही गरजेच्या वेळी लगेच वापरू शकता.

खात्यात पैसे नसले तरी हे खाते चालू राहते. तसेच आपत्कालीन खर्चासाठी त्वरित १० हजार रुपये मिळतात. या खात्यासोबत मिळणाऱ्या RuPay डेबिट कार्डवर तुम्हाला २ लाखांपर्यंत अपघात विमा संरक्षण मिळते.

ओव्हरड्राफ्ट सुविधा खूप उपयुक्त असली तरी, ती वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. हे पैसे बँकेचे कर्ज असल्यामुळे नंतर ते परत करावे लागतात. तसेच, सामान्य कर्जापेक्षा यावर थोडे जास्त व्याजदर लागू होतो.

वेळेवर पैसे परत न केल्यास तुमचा क्रेडिट रेकॉर्ड (CIBIL Score) खराब होऊ शकतो. म्हणूनच, खातेदारांनी ही सुविधा केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन परिस्थितीत ही रक्कम वापरावी.

ही योजना सामान्य माणसाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एक मोठा आधार देते. अशा प्रकारे, जन धन योजना गरजू लोकांना त्वरित आर्थिक आधार देते. परंतु, याचा वापर करताना नियमांचे पालन करणे आणि वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे.