श्रीकृष्ण बनून रचली रासलीला, आज कसं आयुष्य जगत आहे ‘हे’ कलाकार, चौथ्याबद्दल जाणून व्हाल थक्क

आज 16 ऑगस्ट... संपूर्ण देशात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. या खास दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे असंख्य भक्त कृष्णाची पूजा करतात. तर छोट्या पडद्यावर श्रीकृष्णाची भूमिका पार पाडणाऱ्या अनेक कलाकारांनी देखील प्रेक्षकांना जवळून कृष्णाचे विचार समजवून सांगितले. तर तेच कलाकार आज कसं आयुष्य जगतात जाणून घेऊ...

| Updated on: Aug 16, 2025 | 9:55 AM
1 / 7
अभिनेते नितीश भारद्वाज यांनी बी. आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका बजावली. अखेरीस त्यांना 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'केदारनाथ' सिनेमात पाहण्यात आलं होतं.

2 / 7
अभिनेते सर्वदमन डी बॅनर्जी यांनी रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्ण' मालिकेत कृष्णाच्या भूमिकेला न्याया दिलेला. आता ते हिंदी सिनेमासोबतच तामिळ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

3 / 7
अभिनेते विशाल करवाल यांनी 'द्वारकाधीश' मालिकेत भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली होती. आता ते 'श्री तिरुपती बालाजी' मालिकेत भगवान विष्णू यांची भूमिका बजावत आहेत.

4 / 7
धृती भाटिया हिने 'जय श्री कृष्ण मालिकेत' बालकृष्णाच्या भूमिकेला न्याय दिलेला. तिची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली. त्यानंतर 2011 मध्ये धृती हिला 'सास बहू बेटिया' मालिकेत पाहण्यात आलं. ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे.

5 / 7
धृती हिच्यानंतर 'जय श्री कृष्णा' मालिकेत अभिनेता मेघन जाधव याने श्रीकृष्णाच्या भूमिका साकारली. आता अभिनेता मराठी मालिका 'लक्ष्मी निवास'मध्ये व्यस्त आहे.

6 / 7
अभिनेता सौरभ राज जैन प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहे. 'महाभारत' मालिकेत त्याने भगवान श्रीकृष्ण यांची भूमिका साकारली आणि सर्वांच्या मनावर राज्य केलं. आता सौरभ 'तू धडकन मैं दिल' सिनेमात राघव ही भुमिका साकारत आहे.

7 / 7
अभिनेता सुमेध मुदगलकर याने 'राधाकृष्ण' मालिकेत आपल्या निरागस अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकलं. मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. आता सुमेध टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.