Fish Market: ‘या’ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठं फिश मार्केट, मिळतात अनेक प्रकारचे मासे
Fish Market: नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण कोणत्या मार्केटमध्ये मासे स्वस्त आणि ताजे मिळतात अशा प्रश्न अनेकांना पडतो. जगात असा एक फिश मार्केट आहे, जो सर्वात मोठा फिश मार्केट म्हणून ओळखला जातो.

सध्या ज्या फिश मार्केटची चर्चा रंगली आहे, हा फिश मार्केट भारतात नाही तर, जपान याठिकाणी आहे. जपानची राजधानी टोक्यो येथील सुकिजी याठिकाणी जगातील सर्वांत मोठं फिश मार्केट आहे.

सुकिजी येथील बाजार एक होलसेल मार्केट आहे. जपान देशातील हे फिश मार्केट फार जुनं आहे. सुकिजी याठिकाणी असलेला बाजार समुद्रातील जीव आणि माशांसाठी प्रसिद्ध आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकिजी येथे असलेल्या मार्केटमध्ये प्रत्येक दिवशी 2000 मीट्रिक टन सीफूड विक्री होतो. गेल्या अनेक वर्षांपासून मार्केट सुरु आहे.

फिश मार्केट पाहाण्यासाठी अनेक पर्यटक देखील सुकिजी मार्केटला भेट देतात. येथे मासे खरेदी करण्यासाठी बोली लावली जायची... ही बोली सकाळी 5.30 ते 10 वाजे पर्यंत सुरु असायची...

मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे मिळतात. मार्केटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. जपान देशा त्यांच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो.