Asian Games 2026: गोल्ड मेडल ठीक आहे पण टीम इंडियाला बाहुल्या का दिल्या? कारण ऐकून तुम्हीही व्हाल शॉक

Asian Games Winner 2026: भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले, यानंतर भारतीय संघाना पदकासबोत बाहुल्या दिल्या गेल्या असं का ते कारण जाणून घ्या...

| Updated on: Sep 23, 2026 | 9:18 AM
1 / 5
आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही फोटो शेअर केले ज्याची आता चर्चा रंगली आहे. महिला खेळाडूंनी काही ट्रॉफी सेलिब्रेशनच्या वेळेचे फोटो शेअर केले ज्याच एका गोष्टीने लक्षवेधून घेतले आहे.

आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर काही फोटो शेअर केले ज्याची आता चर्चा रंगली आहे. महिला खेळाडूंनी काही ट्रॉफी सेलिब्रेशनच्या वेळेचे फोटो शेअर केले ज्याच एका गोष्टीने लक्षवेधून घेतले आहे.

2 / 5

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेटचे सुवर्णपदक पटकावले. यानंतर सुवर्णपदकासह भारतीय खेळाडूंना बाहुल्याही देण्यात आल्या.

3 / 5

सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पोडियमवर पदक स्वीकारले. पण यावेळी पदकासोबत खेळाडूंच्या हातात जपानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुंदर बाहुल्याही देण्यात आल्या होत्या. या बाहुल्यांनी सोशल मीडियावरही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांना प्रश्न पडला की बाहुल्या का दिल्या?

4 / 5

या बाहुल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अधिकृत मॅस्कॉटशी संबंधित स्मरणिका असून आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना पदकसोबत यजमान देशाकडून अशा स्मरणिका देण्याची परंपरा आहे.

5 / 5

यामुळे भारतीय खेळाडूंसाठी या बाहुल्या केवळ एक भेटवस्तू नसून, जपानमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकाची खास आठवण असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us