
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. जवान चित्रपटाने कमाईमध्ये मोठे रेकाॅर्ड तयार केले. इतकेच नाही तर ओपनिंगलाही जबरदस्त कामगिरी केली.

शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये जवान चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ बघायला मिळाली. आता नुकताच जवान चित्रपटाचे 17 व्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आलंय.

जवान चित्रपटाने पठाण चित्रपटाचा रेकाॅर्ड ब्रेक करत थेट 17 व्या दिवशी 13 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. म्हणजेच 17 व्या दिवशीही चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ आहे.

शाहरुख खान हा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. इतकेच नाही तर तो आताही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात दिसतोय.

शाहरुख खान याच्यासोबत जवान चित्रपटामध्ये साऊथ स्टार नयनतारा मुख्य भूमिकेत दिसली. इतकेच नाही तर दीपिका पादुकोण हिचाही कॅमिओ बघायला मिळाला.