
जर तुम्ही एकटेपणाच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्हाला स्वत:ला बदलाव लागेल, असं जया किशोरी यांनी म्हटलं आहे. तुम्ही स्वत:सोबत असाल, तर तुम्ही कधीच एकटे नसता. तुम्हाला तुमच्या विचारांमध्ये बदल करावा लागेल.

लोक अनेकदा दुसऱ्यांवर प्रेम करतात. पण ते स्वत:ला विसरतात. तुम्हाला स्वत:वर प्रेम कराव लागेल, असं जया किशोरी म्हणाल्या.

आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला आयुष्य जगणं शिकाव लागेल. तुम्ही आयुष्य जगण्याच ठरवलं, तर तुम्हाला जीवन खूप सुंदर वाटेल, असं जया किशोरी म्हणाल्या.

तुम्ही दुसऱ्यांसाठी स्वत:ला बदलू नका. पण तुम्ही स्वत:साठी बदलू शकता. तुम्ही जगाशी खोटं बोलू शकता. पण स्वत:शी बोलू शकत नाही, असं जया किशोरी म्हणाल्या.

आयुष्य एक खेळ आहे. तुम्हाला त्या खेळात जिंकायच असेल, तर धैर्य, संयम ठेवा. कधी-कधी स्वत:मध्ये बदल केल्यास, आयुष्यातील अनेक समस्या सुटतात. आयुष्यात सुधारणा करण्यासाठी हे आवश्यक आहे.