
जेनिफर मिस्त्री अर्थात तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील मिसेस सोढी हिने मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे केले. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जेनिफर मिस्त्री हिने परत एकदा नवा आणि धक्कादायक आरोप हा असित कुमार मोदी यांच्यावर केला आहे. जेनिफर मिस्त्री हिने केलेल्या या आरोपानंतर सर्वचजण हैराण झाले आहेत.

जेनिफर मिस्त्री म्हणाली की, मालिकेच्या सेटवर लहान मुलांना फार जास्त त्रास देण्यात आलाय. टप्पू सेनेला हा त्रास देण्यात आलाय. त्यांच्या परीक्षेच्या वेळी देखील त्यांना सुट्टी दिली जात नसत.

हे लहान मुले सेटवर रात्रभर शूटिंग करायचे आणि सकाळी परीक्षेला जात होते. बऱ्याच वेळा ते परीक्षेवरून थेट मालिकेच्या सेटवर पोहचायचे. ते सेटवर बऱ्याच वेळा अभ्यास करायचे.

परीक्षेसाठी देखील लहान मुलांना सुट्टी देण्यात आली नाही. कायमच लहान मुलांना मालिकेच्या सेटवर त्रास हा दिला गेला आहे. आता जेनिफर मिस्त्री हिच्या या खुलाश्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.