‘झिम्मा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच येणार तिसरा भाग, कोण असतील कलाकार?

'झिम्मा' या फ्रँचाइच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटासंदर्भात नुकतीच मोठी घोषणा केली आहे. 2021 मध्ये 'झिम्मा' आणि 2023 मध्ये 'झिम्मा 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

| Updated on: Feb 06, 2026 | 12:56 PM
1 / 5
गेल्या काही वर्षांत मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं अत्यंत उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यामध्ये 2021 मध्ये प्रदर्शित झालेला 'झिम्मा' आणि त्यानंतर 2023 मध्ये आलेला त्याचा दुसरा भाग 'झिम्मा 2' बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले होते.

2 / 5
महिलांचं भावविश्व मांडणाऱ्या या चित्रपटांची कथा सगळ्यांना भावली आणि जगभरात त्याचं कौतुक झालं होतं. विविध ठिकाणी राहणाऱ्या, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या सात जणी एकत्र सहलीला जातात आणि त्या सहलीदरम्यान ज्या रंजक, भावूक आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडतात, त्यावर आधारित या चित्रपटांची कथा होती.

3 / 5
'झिम्मा' फ्रँचाइजीचा एक मोठा चाहतावर्ग असून प्रेक्षक कायमच त्याच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा करत होते. आता अशा चाहत्यांसाठी हेमंत ढोमेनं मोठी आनंदाची बातमी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याने 'झिम्मा 3'ची घोषणा केली आहे.

4 / 5
'क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम' या चित्रपटाच्या यशानिमित्त नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हेमंतने 'क्रांतिज्योती विद्यालय 2' आणि 'झिम्मा 3' या दोन नवीन चित्रपटांची घोषणा केली.

5 / 5
'झिम्मा'मध्ये सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, अनंत जोग, सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी, मृण्मयी गोडबोले, निर्मिती सावंत यांच्या भूमिका होत्या. तर दुसऱ्या भागात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे यांची त्यात भर पडली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us