Jio : ग्राहकांसाठी जिओची दिवाळी ऑफर! आता एकदाच रिचार्ज करा आणि 3 वर्ष अनलिमिटेड इंटरनेट वापरा, जाणून घ्या फायदे, वैधता आणि बरंच काही
Jio च्या ग्राहकांसाठी jio ने एक मोठी दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. ज्यामुळे 3 वर्षे जिओच्या ग्राहकांना मोबाईलला रिचार्ज करण्याची गरज लागणार नाही. फक्त एकदाच रिचार्ज करायचा आणि 3 वर्ष मोबाईल वापरायचा. जाणून घ्या जिओच्या या रिचार्जबद्ल सविस्तर,

मोबाईलचा रिचार्ज संपला कि पुन्हा प्लॅन शोधा, पैसे भरा आणि रिचार्जची तारीख लक्षात ठेवा,ही कटकट आता काही वर्षांसाठी बंद होणार असं सांगितलं तर? या दिवाळीत Jio तुमच्यासाठी अशी एक रिचार्ज ऑफर घेऊन आलंय ज्यामुळे 3 वर्ष तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज नाही.
या रिचार्जमध्ये तुम्हाला 3 वर्ष इंटरनेटसह, अनलिमिटेड कॉलिंग, 2.5 GB हायस्पीड डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटाही मिळणार आहे.
जिओच्या या नवीन प्लॅनची किंमत 10 हजार रूपये असून त्याची वैधता 1,095 दिवस म्हणजेच 3 वर्षांची आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच दररोज हायस्पीड डेटा आणि 100 MMS मिळणार आहेत.
याशिवाय पात्र ग्राहकांना दररोजचा अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ मिळणार आहे. मात्र यासाठी 5G स्मार्टफोन आणि जिओचं 5G नेटवर्क लागण्याची गरज आहे.
मनोरंजनासाठी JioHotstar चं सबस्क्रिप्शन : या रिचार्जमध्ये केवळ कॉलिंग आणि इंटरनेटच नाही, तर मनोरंजनाची ही सुविधाही दिली आहे. याचसोबत ग्राहकांना Mobile + Hollywood सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामुळे चित्रपट,वेब सीरीज, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि लाईव्ह स्पोर्टस पाहता येणार आहेत.
10,000 महिन्याला महाग वाटू शकतात पण :10,000 रूपयांचा आकडा ऐकून अनेकांना हा रिचार्ज महाग वाटू शकतो. पण तीन वर्षांच्या वैधतेनुसार हिशोब लावला, तर महिन्याला सरासरी 278 रूपये खर्च येतो. म्हणजेच दिवसाला साधारण 9 रूपये. जिओच्या 3,599 रूपयांच्या वार्षिक प्लॅनचे तीन वेळा रिचार्ज केल्यास एकूण 10,797 रूपये खर्च होतात. त्या तुलनेत नव्या रिचार्जमध्ये 797 रूपयांची बचत होते.
जिओचा हा 10,000 रूपयांचा प्लॅन 7 नोव्हेंबर 2026 पासून देशभरात उपलब्ध झाला आहे. ग्राहकांना MyJio अॅप, Jio.com वेबसाईट, जिओ स्टोअर्स वरून रिचार्ज करता येणार आहे.
एकंदरीत वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा आलेल्या लोकांसाठी हा प्लॅन एकदम बेस्ट आहे. एकाच रिचार्जमुळे 3 वर्षाची कटकट संपणार आहे. त्याशिवाय अनलिमिटेड डेटा ही मिळणार आहे.