1564 रुपयात संपूर्ण वर्षभर चालवा स्कूटर… VIDAचं हटके रेकॉर्ड
हिरो विडा (VIDA) ने धनत्रयोदशीला 600 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी करत आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले. विडा VX2 इलेक्ट्रिक स्कूटर ₹1564 मध्ये वर्षभर चालते (15 किमी/दिवस). ही स्कूटर उत्तम वैशिष्ट्ये, 187 किमी रेंज आणि मजबूत बाजारासह भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एक आहे.

इलेक्ट्रिक टू व्हिलर्सच्या वाढत्या मागणीच्या दरम्यान हिरो विडा (VIDA) ने नवीन आणि हटके रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. विडाने धनत्रयोदशीच्या दिवशी एकाच दिवसात 600 हून अधिक विडा व्हिएक्स 2 इलेक्ट्रिक स्कूटर डिलिव्हर केल्या आहेत. ब्रँडने या सर्व स्कूटर्स जयपूरमध्ये डिलिव्हर केल्या आहेत. आशिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
विडाने एकाच शहरात एकाच दिवसात सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर डिलिव्हरी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ही संपूर्ण डिलिव्हरी जयपूरच्या विडा एक्सपिरिअन्स सेंटरमधून झाली आहे. विडाने भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये आपली स्थिती अत्यंत भक्कम केली आहे. एवढ्या मोठ्या डिलिव्हरीमुळे विडाचा आत्मविश्वासही वाढला असून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
गेल्या महिन्यातील सेल्स डेटावर नजर टाकली तर, हिरो विडा भारतातील चौथी सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हिलर कंपनी आहे. ऑटो पंडित्जच्या रिपोर्टनुसार, विडाने ऑक्टोबर महिन्यात 29,958 इलेक्ट्रिक व्हेईकल विकल्या आहेत. ईयर ऑन ईयर ही ग्रोथ 81.6 टक्क्याची आहे. या व्हिएक्स 2 इलेक्ट्रिक स्कूटरची खास वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
काय आहेत विडा व्हिएक्स 2मध्ये खास?
विडाच्या व्हिएक्स 2 रेंजमध्ये अनेक स्कूटर येतात. कंपनी वेगवेगळ्या बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर या सीरीजच्या अंतर्गत विकते. व्हिएक्स 2 प्लसबाबत सांगायचं म्हणजे, या स्कूटरची टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे. यात रिमूव्हेबस बॅटरी मि्ळते. स्कूटरमध्ये रायडरला मल्टिपल रायडिंग मोड्स आहेत.
फिचर्सबाबत सांगायचं तर, यात 4.3 इंचाचा टीएफटी डिस्प्ले मिळतो. यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि ओटिए अपडेट सारखे फिचर्स मिळतात. स्कूटर 33.2 लीटरच्या अंडर सीट स्टोअरेज सोबत येतो. यात डिस्क आणि ड्रम ब्रेकचा कॉम्बो मिळतो.
ऑक्टोबरमध्ये बंपर ग्रोथ
विडाने ऑक्टोबर 2026मध्ये दमदार विक्री केली आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक टू व्हिलरच्या रिटेल सेल्समध्ये वर्ष दर वर्षाला 80 टक्क्यांची वाढ झाली आहे. इलेक्ट्रिकट टू व्हिलर मार्केटमध्ये विडाची भागिदारी ऑक्टोबर 2026मध्ये वाढून 13.6 टक्के झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 11.1 टक्के एवढी होती.
व्हिएक्स 2 प्लस दोन बॅटरी ऑप्शनसोबत येतो. स्कूटरच्या 3.4kWh वाल्या बॅटरीमध्ये 146 किलोमीटरची रेंज मिळते. यात 4.4kWh बॅटरीवाला ऑप्शनही येतो, तो 187 किलोमीटरची क्लेम रेंज ऑफर करतो. तसंच कंपनी व्हिएक्स 2 गो सीरीजही देते. यात अधिक बॅटरी ऑप्शन मिळतो.
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही स्कूटर पूर्ण वर्षभर चालवण्यासाठी फक्त 1564 रुपये खर्च येईल. त्यासाठी कंपनीने 15 किलोमीटरचा डेली डिस्टन्स बेस बनवला आहे. म्हणजे तुम्ही दिवसाला 15 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकता. आणि स्कूटर चार्ज करण्यासाठी 10 रुपये प्रति यूनिट खर्च येतो. तसेच एका यूनिटमध्ये तुम्ही 35 किलोमीटर प्रवास करू शकता.
