भोंदूबाबाविरोधात तरुणीचा संघर्ष, 6 एपिसोड्सची सीरिज ट्रेंडिंगमध्ये; शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा कोर्टरुम ड्रामा

OTT Top Trending: ओटीटीवर येताच ही वेब सीरिज टॉप 10 मध्ये पोहोचली आहे. सहा एपिसोड्सचा हा कोर्टरुम ड्रामा ट्रेंडिंग लिस्टमध्ये धुमाकूळ घालतोय. यामध्ये 'सैय्यारा' फेम अनित पड्डाची भूमिका आहे.

| Updated on: Sep 27, 2026 | 9:44 AM
1 / 5
ओटीटीवर सध्या क्राइम आणि कोर्टरूम ड्रामाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच जियो हॉटस्टारवर 25 सप्टेंबरला प्रदर्शित झालेली ‘हुंकार: द रोर’ ही सहा एपिसोड्सची सीरिज चर्चेत आली आहे. रिलीज झाल्यानंतर ही सीरिज प्लॅटफॉर्मच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये दाखल झाली.

ओटीटीवर सध्या क्राइम आणि कोर्टरूम ड्रामाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच जियो हॉटस्टारवर 25 सप्टेंबरला प्रदर्शित झालेली ‘हुंकार: द रोर’ ही सहा एपिसोड्सची सीरिज चर्चेत आली आहे. रिलीज झाल्यानंतर ही सीरिज प्लॅटफॉर्मच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये दाखल झाली.

2 / 5

‘सैयारा’मधून लोकप्रिय झालेली अनीत पड्डा आणि फातिमा सना शेख यांच्या अभिनयामुळेही सीरिजकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. ‘हुंकार: द रोर’ची कथा 17 वर्षांच्या मीनू रावत या मुलीभोवती फिरते. मीनू एका प्रभावशाली आध्यात्मिक गुरूवर अत्याचाराचा आरोप करते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी, न्यायालयीन लढाई आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक दबाव याभोवती कथा पुढे सरकते. मीनूच्या भूमिकेत अनीत पड्डा दिसते.

3 / 5

या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी एसीपी जसलीन सिंह सोइन या पोलिस अधिकाऱ्यावर सोपवली जाते. ही भूमिका फातिमा सना शेखने साकारली आहे. तपास जसजसा पुढे जातो, तसतसे या प्रकरणातील अनेक गुंतागुंतीचे पैलू समोर येतात. ‘सैयारा’नंतर अनीत पड्डा पुन्हा एका गंभीर आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसत आहे. ‘हुंकार’मधील मीनूच्या व्यक्तिरेखेत तिच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळते.

4 / 5

फातिमा सना शेखने साकारलेली एसीपी जसलीनची भूमिका कथेला तपासाचा महत्त्वाचा धागा देते. तिच्यासोबत मोहम्मद झीशान अय्यूब, राम कपूर, रघुबीर यादव, अर्जुन माथुर, राजेश शर्मा, चारू शंकर आणि झोया हुसैन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. कोर्टरूममधील वकीलांच्या युक्तिवादांनाही कथेत महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.

5 / 5

नित्या मेहरा आणि करण डी. कपाडिया यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सहा एपिसोडची ही सीरिज क्राइम, सोशल थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा अशा तीन वेगवेगळ्या अंगांनी कथा मांडते. सध्या जियो हॉटस्टराच्या टॉप 10 ट्रेंडिंगमध्ये ‘हुंकार’ची एण्ट्री झाल्याने ही सीरिज ओटीटी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us