Jio : इंटरनेटचा वापर नसताना महागडा रिचार्ज करावा लागतोय? मग Jio तुमचा खर्च करणार कमी, फक्त 150 रूपयांपासून रिचार्ज सुरू

मोबाईल रिचार्ज करताना आपल्याला अनेकदा कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचेही पैसे मोजावे लागतात. पण काही जणांना मोबाईलवर इंटरनेटची गरजच नसते.

| Updated on: Nov 01, 2026 | 3:24 PM
1 / 7
मोबाईल रिचार्ज करताना आपल्याला अनेकदा कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचेही पैसे मोजावे लागतात. पण काही जणांना मोबाईलवर इंटरनेटची गरजच नसते. काही जणांकडे इंटरनेटसाठी Wi-Fi असतं तर काही जण फोन फक्त काँलिंगसाठीच वापरतात.

मोबाईल रिचार्ज करताना आपल्याला अनेकदा कॉलिंगसोबत इंटरनेट डेटाचेही पैसे मोजावे लागतात. पण काही जणांना मोबाईलवर इंटरनेटची गरजच नसते. काही जणांकडे इंटरनेटसाठी Wi-Fi असतं तर काही जण फोन फक्त काँलिंगसाठीच वापरतात.

2 / 7

पण त्यामुळे त्यांना फुकटमध्ये रिचार्जसाठी एक्स्ट्रा पैसे वाया घालवावे लागतात. अशा ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने आता खास व्हॉईस ओन्ली रिचार्ज प्लॅन आणले आहेत. विशेष म्हणजे, या प्लॅनची सुरूवात 147 रिचार्ज पॅकपासून होणार आहे.

3 / 7

जिओचा सर्वात स्वस्त व्हाईस ओन्ली रिचार्ज प्लॅन 147 रूपयांचा आहे. या रिचार्जमध्ये 22 दिवसांची वैधता मिळणार आहे. रिचार्जवर कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करता येते. सोबत एकूण 300 MMS ही मिळतात. मात्र इंटरनेट डेटा मिळत नाही.

4 / 7

177 आणि 196 रूपयांचे प्लॅन : 177 दिवसांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता दिली जाते. यातही अमर्यादित कॉलिंग आणि 300 MMS मिळतात. तर 196 रूपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांची वैधता असून कॉलिंग आणि 300 MMS ची सुविधा मिळते.

5 / 7

197 रूपयांचा प्लॅन आहे वेगळा :Jio ने 197 रूपयांचा आणखी एक प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ठरावीक 30 दिवसांऐवजी संपूर्ण कॅलेंडर महिन्याची वैधता मिळते. या प्लॅनमधेही अमर्यादित कॉलिंग आणि 300 MMS मिळतात.

6 / 7

Jio कडे तीन महिने आणि जवळपास वर्षभराचे पर्यायही उपलब्ध आहेत. ज्यांना वारंवार रिचार्ज करायचा त्रास नको आहे. त्यांच्यासाठी जिओकडे 448 आणि 1,748 रूपयांचे ओन्ली व्हाईस प्लॅनही आहेत.

7 / 7

हे रिचार्ज विशेषत: साधे किपॅड मोबाईल वापरणारे, ज्येष्ठ्य नागरिक, दोन सिम कार्ड वापरणारे आणि इंटरनेटसाठी Wi Fi वर अवलंबून असणारे या ग्राहाकांसाठी हा रिचार्ज उपयोगी ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us