Namrata Shirodkar: मी इतका घाबरलो… जितेंद्र जोशीनी सांगितला नम्रता शिरोडकरसोबत काम करण्याचा वेगळा अनुभव

Namrata Shirodkar: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशीने नुकताच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 7:54 AM
1 / 5
मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी ओळखला जातो. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असलेल्या जितेंद्र जोशीने अवघ्या सतराव्या वर्षी सिनेमाच्या विश्वात पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. नाटक, मराठी चित्रपट आणि बॉलिवूड अशा विविध माध्यमांतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. अलीकडेच त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.

2 / 5

करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात जितेंद्र जोशी ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याच्यासोबत नम्रता शिरोडकरने स्क्रीन शेअर केली होती. ही संधी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिल्याचे जितेंद्र जोशीने सांगितले.

3 / 5

नम्रता शिरोडकरबाबत काम करण्याचा अनुभव नुकताच जितेंद्र जोशीने एका मुलाखतीमध्ये सांगितला. तो म्हणाला की, “मी नम्रता शिरोडकर यांच्यासोबत काम करत होतो तेव्हा माझे वय अगदी भाबडे होते. त्यांच्यासमोर काम करत असल्याचे समाधान वाटत होते, पण त्याचवेळी मला खूप भीतीही वाटत होती. त्यानंतर आमची भेट कधीच झाली नाही. पण त्या जिथे असतील तिथे मी त्यांना मनापासून प्रणाम करतो.”

4 / 5

पुढे तो म्हणाला की, “त्याकाळी मी ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक करत होतो. ते पाहण्यासाठी महेश मांजरेकर आले होते. त्यांनी मला थेट सांगितले, ‘अरे, मी तुला नम्रता शिरोडकरसोबत एक पिक्चर देतो.’ ते ऐकून मला वाटले, माझ्या आयुष्यात अचानक काय चालले आहे हेच कळत नव्हते. नम्रता शिरोडकर म्हणजे केवळ बाह्य सौंदर्यानेच नव्हे, तर मनानेही अत्यंत सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.”

5 / 5

शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना जितेंद्र जोशी म्हणाला, “त्यावेळचे शूटिंग मी कधीच विसरू शकणार नाही. कारण मी इतका घाबरलो... इतक्या मोठ्या स्टारसमोर काम करण्याचे एक वेगळेच दडपण असते. आणि ते स्टार आपल्याशी कसे वागतात, हे आयुष्यभर लक्षात राहते.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us