PHOTO | शरद पवारांइतकेच ‘पावसाळे’ पाहिलेला अमेरिकेचा योद्धा, बायडेन यांच्या पावसातील सभेची महाराष्ट्रात एकच चर्चा

| Updated on: Oct 30, 2020 | 9:17 PM

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार यांच्या फ्लोरिडामधील पावसातील सभेची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. Joe Biden rally in rain at Florida

1 / 7
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या फ्लोरिडामधील पावसातील सभेची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

2 / 7
फ्लोरिडात जो बायडेन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले.

3 / 7
‘वादळ संपेल आणि नव्या दिवसांची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहिली आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर जो बायडेन यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.

4 / 7
जो बायडेन यांच्या पावसातील सभेच्या फोटोची महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकजण या फोटोची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेशी करत आहेत.

5 / 7
जो बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात कडवं आव्हान उभं केलं आहे. अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.

6 / 7
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जो बायडेन यांचा फोटो ट्विटरवर अपलोड करुन महाराष्ट्राने 2019 ला जे पाहिलं तेच अमेरिकेतही पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला.

7 / 7
डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचांही पावसातील डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.