स्वप्नपूर्ती..! ठाण्याच्या मनसे दहिहंडीत जोगेश्वरीच्या ‘साई राम’ पथकाचा 9 थरांचा गोविंदा, पाहा फोटो

मुंबई ठाण्यात दहिहंडीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. कुठे सहा, कुठे सात आणि आठ थरांचे मनोरे पाहायला मिळाले. पण ठाण्याच्या मनसे दहिहंडीत जोगेश्वरीच्या साई राम पथकाने नऊ थरांचा मनोरा रचला

| Updated on: Sep 05, 2026 | 4:30 PM
1 / 5
9 थरांचा विक्रम: ठाणे मनसे दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या 'साई राम' पथकाने यशस्वीरीत्या 9 थर लावून दाखवले. त्यामुळे या वर्षी कोण 9 थर लावणार याचं उत्तर मिळालं आहे. नऊ थरांचा मनोरा रचणाऱ्या पथकामध्ये जोगेश्वरीच्या साई राम पथकाची नोंद झाली आहे.

9 थरांचा विक्रम: ठाणे मनसे दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या 'साई राम' पथकाने यशस्वीरीत्या 9 थर लावून दाखवले. त्यामुळे या वर्षी कोण 9 थर लावणार याचं उत्तर मिळालं आहे. नऊ थरांचा मनोरा रचणाऱ्या पथकामध्ये जोगेश्वरीच्या साई राम पथकाची नोंद झाली आहे.

2 / 5

स्वप्नपूर्तीचा आनंद: गेल्या वर्षी 9 थर लावण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता, मात्र यावर्षी तो यशस्वी करून पथकाने आपले स्वप्न पूर्ण केले. अपयश आलं तरी खचून न जाता या वर्षी जोरदार सराव केला.

3 / 5

गोविंदा भावुक: 9 थर यशस्वीरीत्या पूर्ण होताच ऐतिहासिक यश मिळाल्यामुळे गोविंदांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. कारण गेल्या वर्षी अपयश मिळाल्याने हिरमोड झाला होती. पण यावेळी पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरले.

4 / 5

कठोर परिश्रम आणि सराव: या ऐतिहासिक 9 थरांच्या यशासाठी साई राम पथकाचा गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने कठोर सराव सुरू होता. त्याचं फळ मिळालं.

5 / 5

दहीहंडीत दबदबा: या कामगिरीमुळे जोगेश्वरीच्या साई राम पथकाने यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आता सातत्यपूर्ण कामगिरी करण्यााच मानस आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us