खोल दऱ्या, वाहणारे धबधबे, गुवाहाटीपासून खूपच जवळ आहे हे प्रसिद्ध ठिकाण! सौंदर्य असं की परत येऊ वाटणार नाही

अनेकदा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून शांत ठिकाणी जाण्याकडे अनेकांचा कल असतो. तुम्हीही अशा ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...

| Updated on: Jan 27, 2026 | 6:24 PM
1 / 5
जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि रोमांचक सुट्टी घालवण्याचा विचार करत असाल तर मेघालयमधील एक अप्रतिम हिल स्टेशन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

2 / 5
गुवाहाटीपासून अवघ्या 4 तासांच्या अंतरावर वसलेलं मौसिनराम हिल स्टेशन हे ठिकाण सौंदर्य, शांतता आणि साहस यांचा अनोखा संगम आहे. हे हिल स्टेशन गुवाहाटीपासून सुमारे 152 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. मौसिनरामचं नाव तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्कीच असायला हवं.

3 / 5
मौसिनरामची ओळख ही भारतामधील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून आहे. येथे वर्षभर दमदार पाऊस पडतो. त्यामुळे हिरवीगार डोंगररांग, धबधबे, दऱ्या आणि ढगांनी वेढलेलं वातावरण पाहायला मिळतं.

4 / 5
येथील डोंगराळ भागातून जाणारे वळणावळणाचे रस्ते प्रवाशांना एक अद्भुत आणि रोमांचक अनुभव देतात. गाडी चालवताना आजूबाजूच्या खोल दऱ्या, धुक्याची चादर आणि सतत बदलणारे निसर्गदृश्य मन मोहून टाकते.

5 / 5
तेथील शांतता, शुद्ध हवा आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळतं. गर्दीपासून दूर, निवांत सुट्टी घालवायची असेल तर हे हिल स्टेशन आदर्श मानलं जातं. पावसाळ्यात तर येथील सौंदर्य अधिकच खुलून दिसतं.